नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराने आल्या राहत्या घरी माळाकोळी येथे गळफास घेवून आपले जीवन समाप्त केले आहे. आज 9 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर माळाकोळी येथे अंतिमसंस्कार करण्यात आले.
मुळ माळाकोळी येथील रहिवासी आणि सध्या पोलीस ठाणे रामतिर्थ येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार चंद्रकांत माधवराव चाटे (45) यांनी आपल्या राहत्या घरात, माळाकोळी येथे गळफास घेवून आपले जीवन समाप्त केले. हा प्रकार 8 ऑक्टोबरला अंधार पडल्यनंतर समोर आला.हा प्रकार का घडला या बद्दल काही माहिती मिळू शकली नाही. चंद्रकांत चाटे हे अगोदर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन, मुलगी, जावई असा परिवार आहे. माळाकोळी पोलीसांनी याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अत्यंत भावपुर्ण वातावरणात माळाकोळी येथे आज दुपारी त्यांच्या अंतिमसंस्कार करण्यात आले. पोलीस विभागात चंद्रकांत चाटे यांच्या मृत्यूने हळहळ होत आहे.
पोलीस अंमलदाराने गळफास घेवून आपले जीवन संपवले