नांदेड(प्रतिनिधी)- देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पार्श्र्वभूमीवर महाराष्ट्रातील नांदेड पोलीस, तेलंगणा पोलीस, कर्नाटक पोलीस यांची एक संयुक्त बैठक देगलूर येथे सुरू आहे.
निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या-ज्या ठिकाणी निवडणुक असते. त्या भागा लगत असलेल्या इतर राज्यांच्या पोलीसांनी निवडणुक असलेल्या भागातील पोलीसांसोबत बैठक करून बऱ्याच दक्षतांवर विचार करायचा असतो. या पार्श्र्वभूमीवर नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, देगलूरचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे, बिलोलीचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे, मरखेलचे पोलीस निरिक्षक अनिल चोरमले यांच्यासह मोठा फौजफाटा देगलूर येथे दाखल झाला आहे.
तेलंगणा राज्यातील आणि कर्नाटक राज्यातील पोलीसांच्यावतीने बरेच अधिकारी देगलूर येथे आले आहेत. या बैठकीत निवडणुक संदर्भाने दोन राज्यांमधील येणारी-जाणारी मंडळी, कांही चुकीचे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता, दोन राज्यांमधील गुन्हेगारांचे वास्तव्य यावर चर्चा सुध्दा होईल. निवडणुक संदर्भाने कोणतीही आचारसंहिता भंग न करण्यासाठी काय-काय करावे लागेल यावर चर्चा होईल. नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाची निवडणुक प्रक्रिया सुरू झालेली आहे. या पार्श्र्वभूमीवरच या बॉर्डर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे अशी खात्रीलायक माहिती आहे.
देगलूरमध्ये तीन राज्यांच्या पोलीसांची बार्डर बैठक सुरू