नांदेड(प्रतिनिधी)-7 ऑगस्ट रोजी भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोकर ते हिमायतनगर जाणाऱ्या रस्त्यावर एका माणसाला मारहाण करून त्याचा मोबाईल लुटून नेणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदारांनी जेरबंद केले आहे.
दि.7 ऑगस्ट रोजी भोकर-हिमायतनगर रस्त्यावरील थेरबन जवळ चढाच्या रस्त्यावर जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला थांबवून त्याला मारहाण करून त्याचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला होता. याबाबत तांत्रिक पध्दतीने या गुन्ह्यावर लक्ष ठेवण्यात आले. त्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपले सहकारी पोलीस अंमलदार गोविंदराव मुंढे, शंकर म्हैसनवाड, संजीव जिंकलवाड,सखाराम नवघरे, केंद्रे, हणमंत पोतदार आदींना भोकर विभागात पाठविले.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथकाने त्या ठिकाणी शंकर परमेश्र्वर कऱ्हाळे(21), मारोती यशवंत जंगमवाड (27) रा.खैरबन यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपुस केली असता हा मोबाईल लुटलेला आहे. याची कबुली त्यांनी दिली. या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कायदेशीर कार्यवाही पुर्ण करून पोलीस ठाणे भोकरच्या स्वाधिन केले आहे.
बळजबरीने मोबाईल चोऱ्यांना दोन चोरट्यांना गोविंदराव मुंढे आणि पथकाने जेरबंद केले