जुगार अड्डा लुटला तेंव्हा तेथे झालेल्या मारहाणीतील आरोपी नांदेड ग्रामीण पोलीसांना सापडेनात

नांदेड(प्रतिनिधी)-18 सप्टेंबरला पहाटे 3 वाजेच्यासुमारास 52 पत्यांचा जुगार अड्डा त्या दिवशीच्या घटनेत नांदेड ग्रामीण पोलीसांनी चार जणांविरुध्द लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील नाव लिहिले आरोपी मात्र पोलीसांना सापडलेले नाहीत. ज्याच्या घरासमोर ही लुट झाली त्यांचे नाव वाहब मुल्ला असे आहे. वाहब मुल्लाची जास्त माहिती लिहिण्याची कांही गरज नाही.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी 19 सप्टेंबरच्या रात्री 10.51 वाजता गुन्हा क्रमांक 665/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 397, भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25, 4/27 नुसार दाखल केला. या गुन्ह्यातील तक्रारदार मोहम्मद इमरान मोहम्मद गौस (34) रा.हबीबीया कॉलनी, देगलूर नाका नांदेड यांनी असे लिहिले आहे की, 18 सप्टेंबरच्या 3.30 वाजेच्या सुमारास ते आणि त्यांचे कांही मित्र टायरबोर्ड, रहेमतनगर येथे त्यांचे मित्र वाहब मुल्ला यांच्या घरासमोर गप्पा करत असतांना आशिष सपुरे, चिक्कु महाजन आणि इतर दोन अनोळखी अशा चार लोकांनी त्यांना तलवारी दाखवून पैशांची मागणी केली. तेंव्हा दरोडेखोरांनी त्यांच्या दंडावर वार करून जखमी केले आणि त्यांच्या खिशातील 25 हजार रुपये रक्कम बळजबरीने काढून घेतली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक माणिक हंबर्डे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास आहे.
घटनाघडून आज 20 दिवस झाले आहे. पण तक्रारीत लिहिलेले ज्यांची नावे माहित आहेत असे दोन आणि अनोळखी दोन असे चार दरोडेखोर नांदेड ग्रामीण पोलीसांना सापडलेले नाहीत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्नकाळ दर्जाचे पोलीस अधिकारी कार्यरत असतांना सुध्दा या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. या तक्रारीत लिहिलेले नाव वाहब मुल्ला यांचा काय कारभार? आणि तो कारभार आम्ही लिहिण्याची गरज नाही. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस विभागातील दोन बड्या अधिकाऱ्यांनी वाहब मुल्लाला सध्या आपला म्हणजे त्यांचा “कारभार’ बंद ठेवण्यासाठी सांगितले आहे. त्यासाठी जमा असलेला मोदकांचा प्रसाद पुढच्या कोणत्या आरतीमध्ये परतफेड करू अशा शब्दही वाहब मुल्लाला देण्यात आला आ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *