नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातून आपले कर्तव्य बजावलेले सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक माणिकराव चाटे यांचे 75 व्या वर्षी निधन झाले आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी त्यांची ख्याती होती.
नांदेड जिल्ह्यात 1996 ते 1999 या कालखंडात पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक माणिकराव चाटे यांनी नांदेड जिल्ह्यात कंधार, भाग्यनगर आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आपले कर्तव्य बजावले होते. पोलीस निरिक्षक असतांना त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी दोन हात केले होते. गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ अशा स्वरुपाची माणिकराव चाटे यांची ख्याती होती. पुढे त्यांना पोलीस उपअधिक्षक ही पदोन्नती मिळाली आणि विहित वयोमानानुसार त्यांची पोलीस दलातून सेवानिवृत्ती झाली. त्यानंतर ते औरंगाबाद येथे वास्तव्यास होते. औरंगाबाद येथे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. नांदेड जिल्ह्यातील त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांसाठी श्रध्दांजली अर्पीत केली आहे.