नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर-बिलोल विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आज 9 जणांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता एक खंडीभर उमेदवार रिंगणात राहिलेले आहेत अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांच्या कार्यालयातून निर्गमित करण्यात आली आहे.
आज देगलूर बिलोली मतदार संघात ज्या उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यांना आपले अर्ज परत घेण्याची तारीख होती. त्यानुसार प्रल्हाद जळबा हटकर, धोंडीबा तुळशीराम कांबळे, सुर्यकांत माधवराव भोरगे, रामचंद्र गंगाराम भरांडे, आनंदराव मरीबा रुमाले, ऍड. लक्ष्मण नागोराव देवकरे (भोसीकर), विठ्ठलराव पिराजी शाबुकसार, विश्र्वंभर जळबा वरवंटकर, सिध्दार्थ प्रल्हाद हटकर अशा 9 जणंानी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता निवडणुक रिंगणात 12 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. कॉंगे्रस पक्षाचे जितेश रावसाहेब अंतापूरकर, भाजपचे सुभाष पिराजीराव साबणे, वंचित बहुजन आघाडीचे उत्तम रामराव इंगोले, जनता दल सेक्युलरचे विवेक पुंडलिकराव केरुरकर, बहुजन भारत पार्टीचे प्रा.परमेश्र्वर शिवदास वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गटाचे डी.डी.वाघमारे, अपक्ष उमेदवार अरूण कोंडीबाराव दापकेकर, साहेबराव भिवा गजभारे, भगवान गोविंदराव कंधारे, मारोती लक्ष्मण सोनकांबळे, विमन बाबूराव वाघमारे, कॉ.प्रा.सदाशिव राजाराम भुयारे असे उमेदवार रिंगणात आहे.
देगलूर-बिलोली मतदार संघात खंडीभर उमेदवार शिल्लक ;9 उमेदवारांनी माघार घेतली