नांदेड(प्रतिनिधी)-माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची राष्ट्रपुरूष जयंती म्हणून 15 ऑक्टोबर रोजी साजरी करण्याचे आदेश शासनाने काढल्यानंतर नांदेड पोलीस विभागातील जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांनी ही माहिती जिल्हाभरातील पोलीस घटकांना एका बिनतारी संदेशानुसार पाठवली आहे.
शासनाच्यावतीने 15 ऑक्टोबर 2021, शुक्रवार या दिवशी माजी राष्ट्रपती डॉ.ए.जी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्याबाबत शासनाने परिपत्रकाद्वारे सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करून त्याबाबतची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाला कळवावी अशी माहिती बिनतारी संदेशाद्वारे जिल्ह्यातील सर्व पोलीस घटकांना पाठवली आहे.
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे नाव आता राष्ट्रपुरूषांच्या यादीत ; 15 ऑक्टोबर रोजी साजरी होणार जयंती