नांदेड(प्रतिनिधी)-ट्रक चालक आणि ट्रक मालकाने साड्यांचे तीन गठ्ठे गायब गेल्याचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केला आहे. डिसेंबर 2020 मध्ये घडलेला हा गुन्हा साडे दहा महिन्यानंतर दाखल करण्यात आला आहे.
केशव अंतराव हिरासकर रा.कर्नाटक राज्य यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 डिसेंबर 2020 रोजी त्यांनी ट्रक क्रमांक एम.एच.26 ए.डी.0314 चे मालक बालाजी माणिकराव मुलगे रा.लांडगेवाडी ता.लोहा आणि ड्रायव्हर रमेश अनिल मुंडे यांना कांही साहित्य भरून दिले. ते साहित्य नांदेड येथे दुध डेअरी वसरणी रोड येथे रिकामे करायचे होते. 28 डिसेंबर 2020 रोजी त्या ट्रकमधील मालक उतरला तेंव्हा त्या ट्रकमध्ये असलेले साड्यांचे तीन गठ्ठे किंमत 1 लाख 3 हजार 556 रुपयांचे साहित्य आढळून आले नाही. ट्रक चालक आणि ट्रक मालकांनी हा गुन्हा संगणमताने साड्यांचे गठ्ठे गायब करून केलेला आहे.
नांदेड जिल्ह्यातील अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांनी हा गुन्हा साडे दहा महिन्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 407,34 नुसार क्रमांक 747/2021 नुसार दाखल केला आहे. आज घडलेल्या अनेक गुन्ह्यांना नाकारले जाते. पण हा साड्यांचे गठ्ठे चोरीचा गुन्हा साडे दहा महिन्यानंतर दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा तपास अत्यंत कर्मठ पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गिते हे करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी साडे दहा महिन्यापुर्वीचा गुन्हा दाखल केला