नांदेड(प्रतिनिधी)-आज 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपुरूष, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात साजरी करतांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना अभिवादन केले.
शासनाने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपुरूष या दर्जात त्यांची जयंती साजरी करण्याचे परिपत्रक जारी केले. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, विकास तोटावार, सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, शिवाजी लष्करे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत अभिवादन केले. जनसंपर्क विभागातील पोलीस अंमलदार सुर्यभान कागणे, विनोद भंडारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
पोलीस अधिक्षकांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन केले