नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र अनुवर्तन करून लाखो अनुयांसह बौध्द धर्म स्विकारला होता. या घटनेला आज 65 वर्ष पुर्ण झाली आहेत. आजचा धम्मचक्र अनुवर्तन दिन उत्साहात साजरा करतांना अनेक अनुयांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेवून एक दुसऱ्याला शुभकामना दिल्या.

दसऱ्याच्या दिवशी बोध्दीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: आणि आपल्या अनुयांयाना बौध्द धम्माची दिक्षा दिली. आधुनिक बौध्द शासनाचा पाया भारतभूमित रोवला गेला. भारतीय स्वातंत्र्याने देशातील अस्पृश्य, महिला, शुद्र, शोषीत जनता यांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले होते. पण धर्मरुढी व व्यवस्थेपासून ते स्वतंत्र झाले नव्हते. त्यामुळेच हे धर्मांतर शोषित जनतेला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देणारे ठरले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्म स्विकारला म्हणून हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस अशोक विजयादशमी आणि धम्मविजयादशमी म्हणून साजरा केला जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या असंख्य अनुयायांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हा दिवस उत्साहात साजरा केला.
