नांदेड (प्रतिनिधी) – येत्या 19 ऑक्टोबर रोजी नियोजीत असलेल्या ईद-ए-मिलाद या संदर्भाने शासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. याचदिवशी शरद पौर्णिमा पण आहे. शासनाचे निर्देश आल्यानंतर मरकजी मिलाद कमिटीच्यावतीने सुद्धा यंदाची मिरवणुक रद्द करण्यात आले असल्याचे प्रसिद्ध पत्रक सचिव ऍड. अयुबोद्दीन जहागीरदार यांनी पाठविले आहे.
येत्या 19 ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलादुन्नबी साजरी करण्यात येणार आहे. यासंदर्भाने शासनाने शक्यतो घरातच राहून ही ईद साजरी करावी असे आवाहन केले आहे. मिरवणुक काढलीच तर कमीत कमी वाहने फक्त पाच आणि प्रत्येक वाहनावर फक्त पाच माणसे राहतील असे सांगितले आहे. ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. सर्व धार्मिक कार्यक्रम केबल, टी.व्ही., फेसबुक आदींच्या माध्यमातून प्रसारीत करावी आणि गर्दी टाळावी. तात्पुरत्या पाणपोईची सुविधा केली जाते तेथे स्वच्छता राखावी, असे निर्देश शासनाने परिपत्रकानुसार दिले आहेत. या परिपत्रकावर गृहविभागाचे उपसचिव संजयखेडेकर यांची स्वाक्षरी आहे. हे परिपत्रक 16 ऑक्टोबर रोजी निर्गमीत करण्यात आले आहे.
ईद-ए-मिलादुन्नबी संदर्भाने नांदेड येथे मिरकजी मिलाद कमिटी यांच्यावतीने मिरवणुकीचे आयोजन होत असते. शासनाने काढलेल्या परिपत्रकानंतर मरकजी मिलाद कमिटीचे सचिव ऍड. अयुबोद्दीन जहागीरदार यांनी सुद्धा यंदाची मिरवणुक रद्द केली असल्याचे प्रसिद्धीपत्रक पाठविले आहे.
ईद-ए-मिलादुन्नबी या दिवशी मिरवणुक रद्द -मरकजी मिलाद कमिटी