नांदेड(प्रतिनिधी)-नमस्कार चौकात एक दुकान फोडून चोरट्यांनी 1 लाख 53 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरला आहे. सारखणी येथील विद्युत उपकरणे निर्माण करणाऱ्या एका कंपनीचे शटर फोडून 58 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. भोकर येथून एका कापूस कंपनीतील वजन करण्याचे लोखंडी दगड 26400 रुपये किंमतीचे चोरीला गेले आहेत. सोबत मुदखेड, उस्माननगर, वजिराबाद आणि नांदेड ग्रामीण या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 लाख 75 हजार रुपये किंमतीच्या 5 दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
पवन गोविंदराव डुब्बेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 ऑक्टोबरच्या रात्री 9.30 ते 19 ऑक्टोबरच्या पहाटे 9.30 दरम्यान नमस्कार चौक ते महाराणा प्रताप चौक रस्त्यावर असलेले पवन ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान चोरट्यांनी टीन पत्रे काढून फोडले. त्यातून 1 लाख 53 हजार 200 रुपये किंमतीचा किराणा माल चोरुन नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गौड अधिक तपास करीत आहेत.
सचिन अनिल जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे सारखणी येथील केसुला लाईटींग उत्पादन करणाऱ्या त्यांच्या गोडाऊनचे शटर बंद करून 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता ते घरी गेले. 21 ऑक्टोबरच्या सकाळी 8 वाजता ते दुकानात आले तेंव्हा त्यांचे शटर वाकवून त्यातील रोख रक्कम आणि कांही साहित्य असा 58 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता. सिंदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक भोपळे हे करीत आहेत.
जगदीश काशिराम शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंजित कॉटन मिल उमरी येथून 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ते 21 ऑक्टोबरच्या पहाटे दरम्यान वजन करण्याचे 8 लोखंडी धोंडे किंमत 26 हजार 400 रुपयांचे कोणी तरी चोरले आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कदम अधिक तपास करीत आहेत.
मुदखेडच्या नबीशेठ यांच्या शेताच्या आखाड्यावर आकाश संभाजी कदम यांनी आपली दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए.ए.3708 ही गाडी 11 ऑक्टोबरच्या 10 ते 12 वाजेदरम्यान उभी केली होती ती चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 45 हजार रुपये आहे. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.
केशवराव रामराव कांबळे यांची एम.एच.26 बी.वाय.1980 क्रमांकाची दुचाकी 19 ऑक्टोबरच्या रात्री 11 वाजता काटकळंबा ता.कंधार येथील बौध्द विहाराजवळून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 80 हजार रुपये आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार श्रीमंगले अधिक तपास करीत आहेत.
दत्ता मारोतराव घाटे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 व्ही.के.9925 ही गाडी 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता बसस्थानकातील मोकळ्या जागेतून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 40 हजार रुपये आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. आनंद संभाजी सोनटक्के यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 पी.2201 ही गाडी जवाहरनगर येथून 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 ते 5 या वेळेदरम्यान चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 10 हजार रुपये आहे. नांदेड ग्रामीण पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
दीड लाखांचे किराणा साहित्य चोरले,1 लाख 75 हजारांच्या पाच दुचाकी चोरी