नांदेड(प्रतिनिधी)- येथील मकोका न्यायालयाचे न्यायाधीश के.एन.गौतम यांनी कैलास बिघानीया गॅंग मधील ४ जणांना २७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.यातील तीन जणांना पोलीस पथकाने जालना तुरुंगातून नांदेडला आणले आहे.इतरांची रवानगी सध्या मकोका न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 जुलै रोजी सायंकाळी विक्की ठाकूर यांचा खंजीरने भोसकून आणि पिस्तुलातून गोळ्या झाडून खून झाला होता आणि त्यावेळी सोबत असलेला विक्की ठाकूरचा मित्र सुरज खिराडे यास जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणी गुन्हा क्रमांक 176/2021 ची नोंद झाली होती. याप्रकरणात पोलीसांनी नितीन जगदीश बिघानीया, कैलास जगदीश बिघानीया, ज्योती जगदीश बिघानीया, अंजली नितीन बिघानीया, लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे पाटील, कृष्णा उर्फ किन्ना छगनसिंह परदेशी, अशोक गंगाधर भोकरे, सोमेश उर्फ सोम्या सुरेश कत्ते, दिगंबर टोपाजी काकडे, मुंजाजी उर्फ गब्या बालाजी धोंगडे आदी 11 जणांना अटक झाली होती. सध्या हे सर्व जण तुरूंगात आहेत.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांनी या गुन्ह्यामध्ये मकोका कलम वाढविण्याचा प्रस्ताव पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्याकडे पाठवला होता. तो प्रस्ताव 13 ऑक्टोबर रोजी मंजुर झाला आहे. या गुन्ह्यात आता मकोका कायदा वाढला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्याकडे वर्ग झाला आहे.

आज पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे,पोलीस उप निरीक्षक शेख असद,गणेश गोटके,सचिन सोनवणे,पोलीस अंमलदार दासरवाड,अनिल गायकवाड,नजरे आलम देशमुख,कलंदर, विक्रम वाकडे,कस्तुरे,,बाबुराव,गुंडेरा व करले,गायकवाड,रुपेश दासरवाड,अफजल पठाण,देविदास चव्हाण आणि चार महिला पोलीस अमंलदारानी कैलास बिघानिया गॅंग मधील २ महिला आणि ९ पुरुष आरोपीना न्यायालयात हजर केले.मकोका कायद्यातील तरतुदीनुसार पोलीस कोठडीची मागणी केली.सहायक सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी घटनेतील गांभीर्य आणि पोलीस कोठडीची आवश्यकता नायालयासमक्ष सादर केली.आज चार जणांची पोलीस कोठडी मागतांना पोलिसांनी इतर आरोपीची पोलीस कोठडी मागण्याचा आपला अधिकार सुरक्षित ठेवला आहे. युक्तिवाद ऐकून न्या.एन,के.गौतम यांनी मयुरेश सुरेश कत्ते, दिगंबर टोपाजी काकडे, मुंजाजी उर्फ गब्या बालाजी धोंगडे,कृष्णा उर्फ किन्ना छगनसिंह परदेशी या चार जणांना २७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
न्यायालयात रंगले नाट्य
सर्व ११ आरोपीना न्यायालयात हजर केले तेव्हा कैलास बिघानियाने पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे मला मारून टाकणार आहेत अशी आवई उठवली.प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले की पोलीस पथकाने आरोपींना न्यायालयात आणले.नंतर पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे आले तेव्हा कैलास बिघानिया त्यांनाच बघण्याच्या धमक्या देत होता म्हणे.आज पोलिसांनी कैलासची पोलीस कोठडीत मागितली नाही तेव्हा त्याला डॉ.भोरे मारणार कसे म्हणजे नाटक तयार करून आपला जीव वाचवण्याचा देखावा खोटा होता हे खरे ठरले.आपल्या जीवाची चिंता ज्या कैलासाला वाटत आहे,त्याच्या गॅंगने ज्यांचे जीव मजा घेत घेत घेतले त्यांना आणि आज जिवंत असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना काय वाटले असेल याचाही विचार त्याने करण्याची गरज आहे असे लिहिले तर नक्कीच चूक नाही.