नानक साईची घुमान यात्रा विमानाने पंजाब ला रवाना ; ‘घुमानवारी’ साठी एअर इंडिया चे जम्बो जहाज नांदेड विमानतळावर उतरले

नांदेड(प्रतिनिधी)- संत नामदेव महाराज यांच्या 751व्या जन्म-शताब्दी वर्षाच्या औचित्याने नानक साई फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेली घुमान यात्रा शनिवारी एअर इंडिया चे जम्बो विमानाने पंजाबला रवाना झाली. यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी संत बाबा बलविंदरसिंघ,  महापौर सौ जयश्री पावडे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,जेष्ठ नेते शेषराव चव्हाण, मोहनराव पाटील सुगावकर, यांच्या सह अनेक जण मोठ्या संख्येने नांदेड येथिल श्री गुरू गोबिंद सिंघ जी विमानतळावर उपस्थित होते.

संत नामदेवाची सातशे एकावणवे जन्म – शताब्दी वर्ष आहे. आनंदाचा अनुपम सोहळा अनुभवत सातवी घुमान याञा दुपारी 12-30 वाजता अमृतसर च्या श्री गुरू रामदास आंतरराष्ट्रीय एअर पोर्ट वर पोहचली, तेथे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, घुमान नामदेव दरबार कमिटी,घुमान हरगोविंदपूर चे आमदार सारदर बलविंदरसिंघ लाड्डी,नानक साई फाऊंडेशन पंजाब/हरियाणा शाखेच्या टीमने यात्रेचे जोरदार स्वागत केले. नानक-साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली हि यात्रा आयोजित करण्यात आली आहे.. या वेळी संत नामदेव महाराजांच्या जन्म -शताब्दी वर्षाचा संदर्भ असल्या कारणाने,घुमानवारीला वेगळे,ऐतिहासिक महत्त्व आहे.. 125 भाविक यात्रेत सहभागी झाले आहेत. घुमान यात्रेच्या निमित्ताने केंद्र सरकारने 180 सीट चे जम्बो विमान खास बाब म्हणून मंजूर केलेले आहे.

संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी ‘तीर्थक्षेत्र घुमान’ – ‘सुवर्ण मंदिर’ अमृतसर – शक्ती पीठ ‘माता नैना देवी’ (हिमाचल प्रदेश) – ‘आनंदपूर साहिब’ (तख्त) – आशिया खंडातील सर्वात उंच आणि भव्य ‘भाकरा नांगल’ धरण – पंजाबच्या संस्कृतीचा अंखो देखा इतिहास असलेले ‘विरास्ते ‘खालसा मुजियम’ आनंदपूर साहिब – जालंधर – सुल्तानपूर लोहडी- परजिया कलान-‘कार्तिकी स्वामी’ – वाघा ‘अटारी’ बॉर्डर – ‘माता दुर्गा’ मंदिर अमृतसर – ‘जालियनवाला’ बाग – अमृतसर हवाई अड्डा – असे भ्रमण व दर्शन घडवून यात्रा 28 ऑक्टोबर रोजी नांदेड च्या श्री गुरू गोबिंद सिंघ जी विमानतळावर परतीचा प्रवास करणार आहे..

घुमान वारीचे नांदेड च्या श्री गुरू गोबिंद सिंघ जी विमानतळावर स्वागत आणि यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी नगरसेविका सौ अर्पणा नेरलकर,माधवराव पटणे,सतिश देशमुख तरोडेकर,तुलसीदास भुसेवार, जी. नागय्या, विनायकराव पाथरकर,प्रा.उत्तमराव बोकारे,संजय कदम रुईकर, गंगाधर पांचाळ, बळीराम पवार, आयुब पठाण, गोविंद राऊत, सुभाष लंगडापुरे, बालकृष्ण मराठे, बिरबल यादव,दयानंद बसवंते,बालाजी शेळके, प्रा डी बी जांभरूनकर, श्याम कोकाटे, शंकरराव परकंठे, जयश्री जैसवाल,श्याम कदम,तेजश्विनी लंगडापुरे, विनय लंगडापुरे,प्राजक्ता कदम हे उपस्थित होते. सोमेश्वर च्या प्रसिध्द सोमेश्वर ब्रास बँड च्या वतीने यात्रेला खास सलामी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *