पोलीस अंमलदारांना खाकी कपडा वाटण्यात झाला आहे लाखो रुपयांचा घोटाळा; चौकशीसाठी 25 ऑक्टोबर ही तारीख निश्चित 

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांच्या गणवेश वाटपात लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे. या संदर्भाने दि.25 ऑक्टोबर रोजी गृहपोलीस उपअधिक्षक यांच्या समक्ष अनेकांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
                  या संदर्भाने प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्हा पोलीस दलाने रेमंड कंपनीसोबत करार करून रेमंड कंपनीला पोलीसांच्या गणवेशाचा खाकी कपडा अत्यंत मोठ्या संख्येत ऑडर देवून मागविला होता. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 573 रुपये घेण्यात आले आहेत. कांही लोक सांगतात हा कपड्यांचा खरेदी व्यवहार पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर झाला होता. या कपड्याचे वाटप करण्याची जबाबदारी पोलीस मुख्यालयातील कॅन्टीन विभागावर होती. त्यात कांही पोलीस अंमलदारांना हा खाकी कपडा भेटला पण कांहीना भेटला नाही. कपडा वाटप प्रकारात कपडा मागवणे, त्याचे वाटप करणे, त्याचे पोलीस अंमलदारांकडील पैसे जमा करणे आणि कंपनीला पैसे पाठवणे या सर्व प्रकरणात प्रथम दर्शनी अनियमितता दिसत आहे असे लिहुन गृहविभागाचे पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार यांनी संबंधीत कपडा विभागाचे सर्व व्यक्ती रेमंड कंपनीसोबत झालेल्या कागदपत्रांसह आपल्या कार्यालयात 25 ऑक्टोबर 2021 रोजी हजर ठेेवण्यास सांगितले आहेत. 
                   हा कपड्यातील घोटाळ्याचा प्रकार खुप दिवसांपासून चर्चेत होता. पण आता पोलीस -उपअधिक्षक (गृह) विकास तोटावार यांनी पत्र जारी करून या सर्वांना आपल्या समक्ष हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर या घोटाळ्यावर जवळपास शिक्का मोर्तब झाला आहे. प्रकरणाला काय करायचे हे पोलीस खात्याच्या हातातच असते आणि त्यामुळेच “पोलीस खाते करील तेच होईल’ असा वाकप्रचार प्रसिध्द झाला आहे. मात्र चौकशी होतांना फक्त कांही लोकांवर ठपका ठेवून चौकशी गुंडाळण्याऐवजी त्याचा सखोल अभ्यास करून प्रत्येक दोषीवर कार्यवाही होणे अपेक्षीत आहे. नांदेड जिल्ह्यात जवळपास 4 हजार पोलीस कर्मचारी आहेत. या आकड्याचा गुणाकार 573 रुपयांसोबत केला तर त्याचे उत्तर 22 लाख 92 हजार एवढा येते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *