बिलोली(प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दिक्षा दिली.धम्म प्रचार व प्रसार व्हावा यासाठी भिक्कु संघ सोबत घेतले.पण कौलोघात नांदेड जिल्ह्यात काही भिक्खू राजकीय पक्षाचे कार्यकर्ते झाले आहेत.चिवर घालून कॉंग्रेसचा निवडणूक प्रचार करीत आहेत.परंतु समाज हा “चिवर’ला वंदन करतो व्यक्तीला नाही. ज्या कोणाला कॉंग्रेस पक्षाचा प्रचार करायचा आहे त्यांनी तो खुशाल करावा व चिवर काढून ठेवावे. धम्म दानावर गुजराण करणाऱ्यांना मठ उभारायचा असेल तो उभारावा पण ढोंग सहन केले.जाणार नाही असा गर्भित इशारा वंचितचे पक्ष निरीक्षक प्रा.राजू सोनसळे यांनी महामाया बौद्ध विहार परिसर, डॉ. आंबेडकरनगर बिलोली येथे कॉर्नर प्रचार बैठकीत दिला आहे. यावेळी बाळासाहेब लाखे, ऍड. यशोनील मोगले, आतिष ढगे, अभय सोनकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
देगलूर-बिलोली विधानसभा पोट निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. श्रद्धेय ऍड.बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितकडून डॉ.उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिली आहे. पण नांदेड येथील एक भन्ते जे की स्वतः चा मठ उभा करण्यासाठी जिल्ह्याच्या नेतृत्वाची मांडवली करीत आहेत.वस्तुतः भिक्खू व महाराज यांच्यात खूप फरक आहे. विहार व मठ यातही वेगळेपण आहे. डॉ बाबासाहेब यांनी दिलेल्या धम्मात राजगृहावर श्रामणेर शिबिरात चिवर धारण करणाऱ्या बौद्ध श्रामणेरला वंदन केले जाते.गावोगावी सुद्धा श्रामणेर शिबिरातून चिवर परिधान करणाऱ्यांची पूजा वंदन केले जाते.पण चिवर काढले की त्या व्यक्तीला वंदन कोणी करत नाही कारण चिवर अंगावर असेल तरच समाज त्याला मानतो. ही बाब लक्षात असतानाही इतर धर्माचा दाखला देत, धम्म दानावर गुजराण करणाऱ्या भिक्खू ने जो मुळात मस्के नावाचा समाजद्रोही व्यक्ती आहे तो चिवर परिधान करून श्रद्धेय ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात फिरत आहे.त्याला मठ उभारून मठाधिपती व्हायचंय जो की पूर्णा येथील मठेश्वराचा शिष्य आहे.अशा समज द्रोह्याला त्याची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. हजारो कष्टकरी बांधवाने आजपर्यंत त्याला धम्मदान दिले तेच खाऊन हा समाजाच्या मुळावर उठला आहे. तेव्हा अशा भोंदू चिवरधारी भदंतेला त्याची जागा दाखवली जाईल असा इशारा वंचितचे निवडणूक निरीक्षक प्रा. राजू सोनसळे यांनी दिला आहे.
धम्माचा प्रसार करा,मठ उभारण्यासाठी कॉंग्रेसचे प्रचारक होऊ नका- प्रा. राजू सोनसळे