नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको मातृ सेवा आरोग्य केंद्रास जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटणकर यांनी भेट देऊन मिशन कवच-कुंडल मध्ये सलग रात्रंदिवस ७५ तास अभियान राबवुन लसिकरण करून घेणा-या अधिकाऱ्या सह आरोग्य अधिकारी कर्मचारी व क्षेत्रिय कार्यालय अधिकारी व कर्मचारी व विविध शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी केलेल्या सहकार्य मुळे येथील नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद बद्दल कौतुक करून क्षेत्रीय कार्यालय लवकरच लसिकरण मुक्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ ईटणकर यांनी केले.
मिशन कवच-कुंडल अंतर्गत दि २१ ते २४ दरम्यान नावामनपाचा अंतर्गत सिडको क्षेत्रीय कार्यालय व मातृसेवा आरोग्य केंद्र यांच्या वतीने सलग ७५ तास लसिकरण करत २५ हजारांचा पुढे लसिकरण करण्यात आले होते, यावेळी वेळी परिसरातील खाजगी संस्था शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सह आरोग्य कर्मचारी व परिचारिका,आशा वर्कर्स व अंगणवाडी मदतनीस, सेविका यांचा सहायाने हे अभियान राबविण्यात आले.
मनपाचे सिडको क्षेत्रीय कार्यालय चे सहायक आयुक्त अविनाश अटकोरे,मातृसेवा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अब्दुल हमीद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक सुधीर सिंह बैस दिपक पाटील,नागेश ऐकाळे व १२ वसुली लिपीक यांच्या मार्फत तर आरोग्य साहयक सुरेश आरगुलवार व देविदास भुरे,संदीप तुप्पेकर,जयश्री दरेगावे, मिनाक्षी शिंदे , नसरीन पिंजारी,आकाश शिंगे, उल्हास जाधव, विवेकानंद लोखंडे कर्मचारी यांनी हे अभियान यशस्वी राबविले.
अभियानाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटणकर व मनपाचे उपायुक्त अजितपाल संधु, वैद्यकिय अधिकारी डॉ.सुरेश सिंह बिसेन, डॉ.बद्रोधदीन, यांनी मातृसेवा आरोग्य केंद्र व सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे दि.२५ आक्टोबर रोजी भेट दिली, यावेळी सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्ये स्वागत केले.
जिल्हाधिकारी यांनी मिशन कवच-कुंडल मध्ये उत्कृष्ट सेवा देऊन लसिकरण करणा-या आरोग्य कर्मचारी व अधिकारी, कर्मचारी यांच्ये अभिनंदन केले आहे.आगामी काळात सर्वांचा सहकार्याने क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेला भाग लवकरच लसिकरण मुक्त करावे असे आवाहन केले.
सिडको मातृसेवा आरोग्य केंद्रास जिल्हाधिकारी डॉ विपीन यांची भेट