नांदेड(प्रतिनिधी)-शाळेचे अध्यक्ष आणि सभासद नसतांना दोन जणांनी शिक्षण संस्थेच्या बचत खात्यातून 5 लाख 7 हजार 240 रुपये बनावट व खोट्या सह्या करून उचलल्याची तक्रार दाखल झाली आहे.
उत्तम नागोराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मारोतराव नागोराव शिंदे (68) आणि त्यांचे पुत्र संदीप मारोतराव शिंदे (28) दोघे रा.मनाठा ता.हदगाव या दोघांनी आदर्श विद्यालय शिक्षण समिती मनाठा या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सभासद नसतांना सुध्दा तसे असल्याचे भासवून फसवणू करण्याच्या उद्देशानेच शिक्षण संस्थेच्या नावाचे व पदांचे शिक्के तयार केले. ते शिक्के वापरून महाराष्ट्र ग्रामीण बॅंक मनाठा येथील शिक्षण संस्थेच्या खात्यातून 5 लाख 7 हजार 240 रुपये बनावट व खोट्या स्वाक्षऱ्या करून उचलले आहेत.
मनाठा पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 471 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 140/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांच्याकडे आहे.
शाळेच्या बोगस अध्यक्ष व सभासदाने 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम हडपली