नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्याविरुध्द वाशिम शहर पोलीस ठाण्यात महिला पोलीस अंमलदाराच्या तक्रारीवरुन अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून विष्णुकांत गुट्टे यांची ख्याती आहे.
सन 2007 मध्ये विष्णुकांत गुट्टे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरिक्षक या पदावर कार्यरत होते. त्या ठिकाणी एका महिला पोलीस अंमलदारासोबत त्यांची ओळख झाली होती. या ओळखीचा परिणाम पुढे जास्त जवळीक होण्यात झाला. पुढे विष्णुकांत गुट्टे हे पोलीस निरिक्षक अशी पदोन्नती घेवून नांदेड जिल्ह्यात आले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्यात त्यांना नियुक्ती देण्यात आली. तेथे मागील दोन वर्षापासून ते कार्यरत आहेत. वाशिम जिल्ह्याच्या महिला पोलीस अंमलदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 मे रोजी विष्णुकांत गुट्टे वाशिम येथे आले होते. त्यांनी त्या महिलेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार त्या महिलेने दिल्यानंतर 3 जून रोजी रात्री वाशिम शहर पोलीस ठाण्यात विष्णुकांत गुट्टे यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वाशिम शहर पोलीस ठाणाचे पोलीस निरिक्षक ध्रुवा बावणकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक अलका गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
विष्णुकांत गुट्टे यांनी आपल्या पोलीस जीवनात तीन पदके मिळवलेली आहेत. अत्यंत गोड भाषेत सर्वांशी संपर्क साधण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा दुर्देवाने त्यांच्या घरी पत्नी नाही. पण एक सुस्वभावी पोलीस निरिक्षक म्हणून नांदेडमध्ये ते ओळखले जातात. आपल्या जीवनातील वासे कधी फिरतील याचा काही नेम नसतो. म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षणाला अत्यंत गांभीर्याने घेवून जीवन जगण्याची गरज आहे असे या घटनेतून दिसते.
अर्धापूरचे पोलीस निरिक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्यावर वाशिम येथे अत्याचाराचा गुन्हा दाखल