नांदेड(प्रतिनिधी)-एका टेम्पोमध्ये बैल चोरू नेणाऱ्या तिन जणांना रामतिर्थ पोलीसांनी अटक केली आहे.
राजू गणपतराव वसमते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 ऑक्टोबरच्या सायंकाळी 5.30 ते 26 ऑक्टोबरच्या सायंकाळी 7 वाजेदरम्यान त्यांच्या शेतातील आखाड्यावर, लोहगाव ते नरसी जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेला एक बैल टेम्पो क्रमांक एम.एच.26 ए.डी.8231 मध्ये डांबून घेवून जात असतांना संतोष माणिका शेटकर रा.लोहगाव आणि शेख साजीद शेख खाजा रा.देगलूर, यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी.जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार पठाण अधिक तपास करीत आहेत.
रामतिर्थ पोलीसांनी दोन बैल चोरांना पकडले