शुक्रवारी सापडलेत नवीन चार कोरोना बाधित रुग्ण;दोघांची झाली सुट्टी      

नांदेड,(प्रतिनिधी) – आज शुक्रवारी ६२० तपासणीत चार  नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३२ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०३ अशी आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी  कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज चार  नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
मनपा गृह विलगीकरणातून -०२  रुग्णाला  उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७७१४ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०३ टक्के आहे.
आज ६२० अहवालांमध्ये ६१० निगेटिव्ह आणि ०४ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०३९८ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०४आणि  अँटीजेन तपासणीत ०० असे एकूण ०४ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०५ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०१ आहेत. आज सापडलेले नवीन रुग्ण मनपा-०२,लोहा-०१,यवतमाळ-०१,असे आहेत.
                    आज कोरोनाचे ३२ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१६,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-०६  ,नांदेड जिल्हयात तालुका विलगीकरणात-०६खाजगी रुग्णालयात-०४,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०२ रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *