नांदेड(प्रतिनिधी)-दोन दुचाकी गाडी चोरणारे चोरटे आणि एक मोबाईल चोरणारा चोरटा अशा तीन गुन्हेगारांना शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने गजाआड केले आहे.
29 ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकाने देवेंद्र उर्फ देवा माधवराव सावंत रा.तरोडा आणि सोमेश उर्फ बबल्या गंगाराम रामठक रा.वित्तनगर यांना ताब्यात घेवून विचारपूस केली तेंव्हा त्यांच्याकडे असलेल्या चोरीच्या दोन दुचाकी गाड्या 1 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत. शिवाजीनगर येथून एक गाडी चोरीला गेली होती आणि एक गाडी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली होती.
24 ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर येथील हनुमान मंदिराजवळून एका ज्येष्ठ नागरीकाचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेला होता. या प्रकरणात शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने तपास करून किशन राजू गजभारे याला पकडले आणि चोरलेला मोबाईल जप्त केला. या मोबाईलची किंमत 14 हजार 800 रुपये आहे.
तीन वेगवेगळ्या प्रकरणातील चोरट्यांना जेरबंद करणाऱ्यांना पोलीस पथकाला पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांनी कौतुकाची थाप दिली आहे. या पथकात सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस अंमलदार संजय मुंडे, रामकिशन मोरे, दिलीप राठोड, शेख लियाकत, बामणे, राजकुमार डोंगरे, काकासाहेब जगताप, मधुकर आवातीरक यांचा समावेश आहे.
शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने एक मोबाईल चोर, दोन दुचाकी चोर पकडले