नांदेड(प्रतिनिधी) – आपला नवरा आणि दिरावर रागवून बहिनीच्या जावयाचा मुलगा तो सुध्दा अल्पवयीन असतांना त्याचा खून केल्याचा प्रकार पेालीस ठाणे माळाकोळी यांच्या हद्दीत घडला आहे.
31 ऑक्टोबर रोजी 12 वाजेच्यासुमारास एका 13 वर्षीय अल्पवयीन बालकाचा खून घडल्याचा प्रकार समोर आला. हा खून त्यांच्याच कुटूंबातील एका 28 वर्षीय महिलेने केल्याची तक्रार देण्यात आली आहे. आपला नवरा आणि दिर यांच्या त्रासापासून मागील 20 दिवसांपुर्वी माहेरी राहायला गेलेल्या महिलेने अल्पवयीन बालकाचा खून केला आहे. माळाकोळी पोलीसांनी अल्पवयीन बालकाच्या खून प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा क्रमांक 179/2021 दाखल केला आहे. पुढील तपास माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक माणिक डोके हे करीत आहेत.
नवरा आणि दिराच्या त्रासाला कंटाळून महिलेने अल्पवयीन बालकाचा खून केला