नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेडमध्ये श्री गुरु गोविंदसिंघजी यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या नगरीत आज तखत स्नान सोहळा मोट्या उत्साहात पार पडला.
दरवर्षी दिवाळीच्या आदल्या दिवशी हा सोहळा साजरा होत असतो.सकाळी जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांनी प्रार्थना (अरदास) करून या सोहळ्याची सुरुवात केली.शहरातील हजारोच्या संख्येने भाविक आपल्या घरातील भांडे घेऊन गोदावरी काठी पोहचले.लहान बालके,बालिका,पुरुष,महिला आणि जेष्ठ नागरिक यात सहभागी झाले होते.सर्वानी गोदावरी नदी पात्रातून आप आपल्या भांड्यात आणलेल्या पाण्याने सचखंड श्री हजुर साहिबजीना स्नान केले.त्यानंतर पुन्हा प्रार्थना झाली आणि प्रसाद वितरण करण्यात आले.
