जीवघेणा हल्ला प्रकरणातील अनंतवार, बोरा आणि जैन यांना शोधण्याचा खडतर प्रयत्न पोलीसांनी करावा !

नांदेड(प्रतिनिधी)-धनराज मंत्रीला जिवे मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि त्याच्या साथीदारांना आज वृत्तलिहिपर्यंत अटक झाली नाही. हा गुन्हा का दाखल झाला यावर वाद-विवाद सुरू झाला आहे. या गुन्ह्यातील नाव लिहिलेल्या तीन्ही आरोपींचे सीडीआर, एसडीआर काढायला हवे म्हणजे कोण-कोण सुर्याजी पिसाळ आहेत हे समजेल. प्रत्येक गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचा अधिकार असलेली स्थानिक गुन्हे शाखा सध्या दिवाळीमुळे व्यस्त आहे. सर्वसामान्य माणुस आरोपी असला तर त्याच्या काखोटीला धरुन पोलीस ठाण्यात आणणारे पोलीस मात्र या गुन्ह्यात एका आरोपीसोबत पोलीस सुरक्षा रक्षक असतांना सुध्दा त्याला शोधू शकले नाहीत. एखाद्या गुन्ह्यातील गुन्हेगाराच्या संपर्कातील व्यक्तींना आणून त्या गुन्हेगाराची माहिती काढणारे पोलीस या गुन्ह्यात मात्र अद्याप कोणालाच आणून कोणतीच माहिती काढल्याचे दिसत नाही.
दि.2 नोव्हेंबर रोजी नांदेड येथील फटका व्यापारी धनराज बद्रीनारायण मंत्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बनावट फटाके आणि चायनीज फटाके विक्री करता म्हणून एक अर्ज आला. त्या अर्जावर चौकशी झाली तेंव्हा पोलीसांसोबत कांही मंडळी आली आणि या विषयावर चर्चा झाली. हा घटनाक्रम दि.29 ऑक्टोबरच्या दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यानचा आहे. तुमची चौकशी लावायची नसेल तर 40 हजार रुपये खंडणी मागण्यात आली. त्यावेळी पवन जगदीश बोराने आपल्याकडील पिस्तुल काढून धनराज मंत्रीकडे रोखून ठोक दुंगा असे म्हणाला होता. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 397/2021 दाखल केला. या गुन्ह्यात पवन जगदीश बोरा, गौतम नरसींगदास हिरावत उर्फ गौतम जैन आणि दत्तात्रय पांडूरंग अनंतवार या तिघांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या प्रेसनोटनुसार यातील पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा विरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा क्रमांक 105/2006, खून करण्याचा प्रयत्न आणि शासकीय नोकरावर हल्ला या सदरात गुन्हा क्रमांक 247/2008 दाखल आहे. तसेच लुट केल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 248/2008 आणि सरकारी नोकराला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 291/2010 दाखल आहे.
गौतम नरसींगदास हिरावत उर्फ गौतम जैन विरुध्द पोलीस ठाणे वजिराबाद येथे गुन्हा क्रमांक 49/2011 हा ईसीऍक्ट कायद्यानुसार दाखल आहे. गुन्हा क्रमांक 25/2016 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार दाखल आहे. गुन्हा क्रमांक 465/2020 हा साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल आहे. तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 85/2020 दाखल आहे.
दत्तात्रय पाडूरंग अनंतवार रा.कवाना ता.हदगाव याच्याविरुध्द पोलीस ठाणे मनाठा येथे गुन्हा क्रमांक 41/2011 हा खंडणी मागण्यासाठी दाखल आहे. पोलीस ठाणे नायगाव येथे गुन्हा क्रमांक 20/2013 हा खंडणी मागणे आणि बेअदबी करण्याच्या कलमांखाली नोंदवलेला आहे.
पोलीसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये जनतेला आवाहन केले आहे की, या तीन आरोपींनी नागरीकांना खंडणी मागितली असेल, धमकी दिली असेल तसेच इतर कोणत्याही कारणासाठी त्रास देत असतील तर त्यांनी वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्याकडे तक्रार द्यावी. पोलीसांनी लिहिलेल्या या शब्दातून पोलीसांमधला आणि जगदीश भंडरवार यांच्यामधला दम दिसतो. पण कोणी सुर्याजी पिसाळांनी जगदीश भंडरवारला त्रास दिला तर त्यांच्यातला हा दम कमी जास्त होवू शकतो. पण त्यांना कोणी पोलीस निरिक्षकाचे पोलीस उपनिरिक्षक करूच शकत नाहीत.
गुन्हा दाखल होताच आरोपीचा शोध घेणाऱ्या पोलीसांना आरोपी शोधण्याअगोदरच त्यांच्यावर हा दबाव टाकण्यात येत आहे की, हा गुन्हा दाखल कसा झाला. दबाव टाकणाऱ्यांना अक्कल नसेल फौजदारी प्रक्रिया संहिता हे अधिकार फक्त प्रभारी पोलीस अधिकाऱ्यालाच देते. दुसऱ्याला गुन्हा दाखल करा किंवा नका करू असे म्हणण्याचा अधिकारच कायद्यात नाही. कायदाच माहित नाही असे नमुने गुन्हा कसा दाखल झाला याची विचारणा करायला लागले. खरे तर या प्रकरणातील आरोपींच्या वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांचे सीडीआर आणि एसडीआर काढायला हवे. त्यातून नांदेड जिल्ह्यात पुर्वी एकच सुर्याजी पिसाळ होता आता त्यात किती मिरसादीक जोडले गेले आहेत हे दिसेल. भारतीय ईतिहासात सुर्याजी पिसाळांसारखाच मिरसादीकांचा ईतिहास जोडलेला आहे. त्यांनी सुध्दा आपल्या सिंहासनाविरुध्द छुपे बंड करून इंग्रजांना भारतात आणले होते.
सर्वसामान्य माणसाविरुध्द गुन्हा दाखल झाला तर त्याच्या काखोटीला धरून पोलीस ठाण्यात आणणारे पोलीस आजच्या परिस्थितीत या गुन्ह्याच्या संदर्भाने सुर्याजी पिसाळ आणि मिरसादीकाला भित आहेत. खरे तर वजिराबाद पोलीस ठाण्यातील एखाद्या पोलीस अंमलदाराला सुध्दा अधिकार दिला तर या तिन ही आरोपींच्या काखोट्या धरून तो पोलीस ठाण्यात आणील. एखाद्या माणसाचे नाव आरोपी या सदरात आल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांना आणून पोलीस आरोपीची माहिती काढतात. पण या प्रकरणात आरोपींच्या संपर्कातील एकाही व्यक्तीला बोलावण्यात आले नाही. या प्रकरणातील एका आरोपीसोबत पोलीस सुरक्षा रक्षक असतो. त्याचा सुध्दा शोध अद्याप पोलीसांना लागलेला नाही.
जिल्ह्यातील 36 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे अधिकार जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेला असतात. कांही आरोपींच्या संपर्कात असतात तो संपर्क त्यांना इतर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी महत्वाचा असतो. पण या गुन्ह्या समांतर तपास स्थानिक गुन्हा शाखेने दिवाळीतील व्यस्ततेमुळे केलेला दिसत नाही. 100 पाप भरले तर आपोआप सत्यानाश होत असतो असे भारतीय आध्यात्मीक ग्रंथ सांगतात. पाहुयात कोणा-कोणाचे 100 होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *