नांदेडच्या दोन पोलीस अंमलदारांचा समावेश

नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 45 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदी पदोन्नती दिली आहे. या 45 जणांमध्ये नांदेड जिल्ह्याच्या दोघांचा समावेश आहे. नवीन जबादारी स्विकारतांना पोलीस दलाचे नाव उज्वल करण्याची अपेक्षा संजय पांडे यांनी पदोन्नती प्राप्त पोलीस उपनिरिक्षकांकडून केली आहे.
सन 2013 मध्ये विभागीय परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदी पदोन्नती देण्यात येत आहे. त्यातील कांही जणांची नावे कांही कारणामुळे मागे पडली होती. त्या सर्व जणांचे अभिलेख तपासून राज्यातील 45 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक गट-ब या पदावर पदोन्नती दिल्याचे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या मान्यतेनंतर विशेष पोलीस महानिरिक्षक संजीवकुमार सिंघल यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत.
पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती प्राप्त करणाऱ्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्यात कार्यरत मल्लीकार्जुन व्यंकटराव कारामुंगे आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत अशोक शिवदास देशमुख यांना पदोन्नती मिळाली आहे. अशोक देशमुख यांची नियुक्ती नांदेड परिक्षेत्रात तर मल्लीकार्जुन कारामुंगे यांची नियुक्ती ठाणे ग्रामीण जिल्ह्यात करण्यात आली आहे.
राज्यात इतर पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे आहेत. त्यांच्या नवीन नियुक्त्या कंसात दिल्या आहेत. मुंबई शहरातील राजेंद्र जयराम देसाई, श्रीकांत प्रभाकर कलगुटकर, सुनिल कृष्णाजी सोनावणे, अरुण तुकाराम घोलेधनेश्र्वर मुरलीधर जंगम, मुमताझुद्दीन नईमोद्दीन कुरेशी, शंकर गोपाळ लोकरे यांना पदोन्नती देवून मुंबई शहरातच नवीन नियुक्ती मिळाली आहे. बबन दिनेश पाटोळे-नाशिक ग्रामीण(नाशिक परिक्षेत्र), चंद्रकांत रामदास निकम-नाशिक शहर (लोहमार्ग नागपूर), दिपक यशवंत कुशारे-नाशिक ग्रामीण(ठाणे ग्रामीण), सलीम फकीर मोहम्मद काझी -नाशिक शहर (लोहमार्ग मुंबई), सुरेश दोधा बावीसकर-नाशिक ग्रामीण(ठाणे ग्रामीण), एकबाल शेखलाल पिरजादे-नाशिक शहर (लोहमार्ग नागपूर), औरंगाबाद ग्रामीणमध्ये कार्यरत पोलीस अंमलदार उत्तम वामनराव आवटे, शिवनाथ परसराम आव्हाळे, काशिनाथ भिमराव लुटे, सुधाकर सुर्यभान पाडळे, जयराम बाजीराव धनवये, विलास केशवराव चव्हाण आणि औरंगाबाद शहरात कार्यरत पोलीस अंमलदार विश्र्वास पुंडलिक महाजन या सर्वांना नवीन नियुक्ती औरंगाबाद शहर व औरंगाबाद परिक्षेत्रात देण्यात आली आहे. गोमाजी मधुकर नेतनकर-यवतमाळ (अमरावती परिक्षेत्र), दिलीप बाळकृष्ण जाधव-औरंगाबाद शहर(लोहमार्ग नागपूर), अनिल चरणसिंग सकवान-यवतमाळ(अमरावती परिक्षेत्र), शेख मोहम्मद नजीम-यवतमाळ(मसुप), संजय देविदास दुबे-यवतमाळ (ठाणे शहर), अश्विनी महेश पवार-मुंबई शहर(मुंबई शहर), सुरेश दत्तु लोटे-ठाणे शहर(ठाणे शहर), नामदेव विष्णु जाधव-रत्नागिरी(कोकण परिक्षेत्र), तुकाराम दलसिंग पवार-यवतमाळ(ठाणे शहर), हेमंत गजानन सुपेकर-औरंगाबाद शहर(ठाणे ग्रामीण), भिमराव दिगंबर पुरी पुणे शहर(पुणे शहर), मिलिंद कारभारी पठारे-औरंगाबाद शहर(औरंगाबाद शहर), काकासाहेब बाबूराव जगदाळे-औरंगाबाद शहर (ठाणे शहर), संतु शिवनाथ खिंडे-नाशिक शहर(नाशिक शहर), ठाणे शहरातील पोलीस अंमलदार निवृत्ती किशन गोंडे, चंद्रकांत लखमा ठाकरे, नवनाथ नामदेव पारधी यांना पुन्हा नवीन नियुक्ती ठाणे शहरातच देण्यात आली आहे. कृष्णा धावू वरठा-ठाणे शहर (ठाणे ग्रामीण), रावसाहेब लक्ष्मण वाघ-औरंगाबाद शहर(ठाणे ग्रामीण), संजय रघुनाथ भवर-नाशिक शहर(ठाणे शहर), सुरेश रामचंद्र गेंगज-पुणे शहर (पुणे शहर), कमलाकर बाबुराव मोरे-नाशिक ग्रामीण (नाशिक शहर), प्रमोद पंढरीनाथ देवरे-नाशिक ग्रामीण (ठाणे शहर) असे सर्व 45 पोलीस अंमलदार दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत.