नांदेड(प्रतिनिधी)- आज दिवाळी संपून पाडव्याचा दिवस आहे. कांही दिवसांपुर्वी अर्थात दिवाळी सुरू होण्याअगोदर नांदेड शहरातील नदी पलिकडे असलेल्या एका जुगार अड्डा चालकाकडून दिवाळी बोनस मागण्यात आला होता. दर महिन्याची बोलणी वसुल करून दिवाळी बोनस द्यावा म्हणून त्याच्या कारभारावर छापा टाकण्यात आला. पण कारभारी सुध्दा भारीच होता. छाप्यात तेथे कांहीच हाती लागले नाही. पण “मोदकां’मध्ये सुध्दा दिवाळी बोनस असतो ही नवीन संकल्पना समोर आली आहे.
प्रसार माध्यमांनी आपल्या लेखण्यांना कितीही झिजवले तरीपण सर्व वाईट कारभार सुरूच राहतात. पण त्यावर वचक आणणाऱ्यांनी आपण घेतलेल्या शपथीप्रमाणे काम केले तर त्यावर काही प्रमाणांत अंकुश नक्कीच येतो. पण तो अंकुश आणायचा की नाही व्यक्ती परत्वे अवलंबून असते. या जगात व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. त्यामुळे घटना घडतच राहतात आणि त्याच्या प्रतिक्रिया उमटत राहतात. दिवाळीच्यापुर्वी नदी पलिकडच्या कांही लोकांनी एका व्यवसायीकाकडून आपल्या महिन्याचे मोदक घेतले आणि नंतर त्याच ठिकाणी दिवाळी बोनससाठी छापा टाकला. पण व्यवसायीक हुशार होता आणि त्यामुळे तेथे कांही सापडले नाही. प्राप्त झालेल्या माहितीनुसार हा छापा दिवाळी बोनससाठी होता हे मोदक घेणाऱ्यांनीच सांगितले. याबाबत एक विचारवंत म्हणतो की, आना देखा जाना देखा एक मुसाफीर खाना देखा, दौरो पर आये बाजों का चिडीया के घर खाना देखा। हर झुग्गी में मिले शिपाही ड्युटी करता खाना देखा, पंख कटाने को पंछी का पिंजरे-पिंजरे जाना देखा ।। आज त्या व्यावसायीकाने आपला कारभार बंद केला आहे तरीपण कांही दिवसानंतर हेच मोदक मागणारे त्याला आपला व्यवसाय सुरू कर म्हणून मागे लागतील. कारण मोदक मिळणे बंद होईल. हे नुकसान मोदकांची सवय लागलेल्या लोकांना महागात पडेल.
नदी पलिकडील मोदक घेणाऱ्यांनी मागितला दिवाळी बोनस