नांदेड(प्रतिनिधी)- एका सेवानिवृत्त 69 वर्षीय व्यक्तीला मी पीएसआय असल्याचे सांगून एका ठक सेनाने फसवणूक केली आणि त्यांच्याकडील 40 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
रुखमाजी खंडोजी धुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान सारनाथनगर शिवरोड येथून ते पायी चालत असतांना एक भामटा आला आणि मी पीएसआय आहे असे सांगून पोलीसाचे ओळखपत्र सुध्दा दाखवले. तुमच्या जवळी साहित्य रुमालात बांधून ठेवा असे सांगून त्यांच्याकडील मोबाईल, खिशातील पॉकीट आणि 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. भाग्यनगर पोलीसांनी या तोतय्या पोलीसाविरुध्द गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.
तोतय्या पोलीसाने वृध्दाला फसवले; 40 हजारांचा ऐवज लंपास