हुतात्मा कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिरात १२० रक्तदात्यांची केले रक्तदान

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्तुत्य उपक्रम
नांदेड,(प्रतिनिधी)-अयोध्या येथे राम मंदिर निर्माणासाठी १९९२ साली  अनेकांनी संघर्ष केला यावेळी काही रामभक्तांना जीवदान सुद्धा द्यावे लागले, आपले सर्वस्व अर्पण करण्याची जिद्द घेऊन निघालेल्या राम भक्तांपैकी म्हणजे राम कोठारी आणि शरद कोठारी बंधू यांच्या बलीदान दिनानानिमित देशभरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दला कडून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
      नांदेड शहरात पंचवटी हनुमान मंदिर हनुमानपेठ (वजिराबाद) येथे आज दि.७ रोजी रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले यावेळी श्री गोळवळकर गुरुजी रक्तपेढी कडून रक्त संकलित करण्यात आले,  यावेळी असंख्य राम भक्तांनी रक्तदान कार्यक्रमास भेट दिली व आपण सुद्धा या समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने रक्तदान केले, यावेळी १२० रक्तदात्यांनी रक्तदान केले असून त्यांना रक्तपेढी कडून प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले.
      यावेळी आनंदबन महाराज कोलंबिकर दत्त संस्थान तुप्पा,विहिंप जिल्हाध्यक्ष नविनभाई ठक्कर, शहरअध्यक्ष डॉ.रविकुमार चाटलावार, डॉ. रमेश नारलावार,दिलीपसिंघ सोढी,दिलीप ठाकूर,पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल, वास्तव न्यूजचे संपादक कंथक सूर्यतळ, विहिंप जिल्हामंत्री शशिकांत पाटील, विहिंप शहरमंत्री गणेश कोकुलवार,आशिषसिंह चौधरी,राजेश देशमुख ,गणेश ठाकूर, अ‍ॅड.गणेश जाधव, कृपालसिंघ हजुरिया,दिलीप कालवानी, बिरबल यादव,महेश देबडवार,सुरेश लंगडापुरे,अशोक पवार,गणेश गादेवार,गणेश यशवंतकर,श्रीकांत पुटवाड,गजानन चंदेल,श्रीधर शर्मा,आकाश कापकर,अवधूत कदम,गणेश फुलारी,खुशाल यादव,प्रशांत शेवाळे,अभिजीत पावडे,मोनू जोशी,उमेश सरोदे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *