कैलाश बिघानीया गॅंगमधील दोघांना मकोका न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले

नांदेड(प्रतिनिधी)-कैलाश बिघानीया गॅंगमधील चार जणांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज मकोका न्यायालयाचे न्यायाधीश एन.के.गौतम यांनी दोन जणांना 15 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात एकूण 12 जणांवर आणि त्यांच्याविरुध्द गटातील लोकांवर मकोका कायद्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
दि.20 जुलै 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्यासुमारास गाडीपुरा भागात विक्रम उर्फ विक्की दशरथसिंह ठाकूर (32) या युवकाचा खून झाला होता. त्याप्रकरणात दोन महिलांसह 8 जणांच्या नावासह गुन्हा क्रमांक 176/2021 दाखल झाला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी एकाच झटक्यात 9 मारेकरी ताब्यात घेतले होते. कैलाश बिघानीयाला सुध्दा त्यांनीच पकडले होते. इतवारा पेालीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यात पुढे मकोका कायदा वाढला आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोेरे यांच्याकडे वर्ग झाला. या गुन्ह्यात मकोका वाढल्यानंतर त्यात एकूण 12 आरोपी आहेत. त्यातील चार जणांना पुर्वी पोलीस कोठडी मकोका कायद्याप्रमाणे मिळाली होती.
आज दि.10 नोव्हेंबर रोजी पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी आपले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शेख असद, गणेश घोटके, पोलीस अंमलदार अनिल मानेकर, समीर देशमुख, गौतम कांबळे आणि तेलंग यांच्यासह सोमेश सुरेश कत्ते (21) आणि गंगाधर अशोक भोकरे (24) या दोघांना न्यायालयासमक्ष हजर करून पोलीस कोठडी मागितली. सहाय्यक सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी सांगितले की, संघटीत गुन्हेगारीमधून किती स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केली हे शोधायचे आहे. सोबतच पुर्वीच्या पिसीआरमधील आरोपी नितीन बिघानीयाकडून 2 लाख रुपये घेवून गंगाधर भोकरेने पाच पिस्तुल खरेदी केले होत अशी कबुली नितीन बिघानीयाने दिलेली आहे. या प्रकरणातील गुन्हेगार मुंजाजी उर्फ गब्या धोंगडे आणि सोमेश कत्ते यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी औरंगाबाद येथून चोरली आहे. या लोकांनी केलेल्या अन्यायाविरुध्द तक्रारदार त्यांच्या भितीने तक्रार देत नाहीत. म्हणून या प्रकरणाचा सखोल तपास करता यावा त्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एन.के.गौतम यांनी सोमेश सुरेश कत्ते आणि गंगाधर अशोक भोकरे या दोघांना 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *