नांदेड(प्रतिनिधी)- श्री. गुरू नानक देवजी यांच्या जयंतीदिनी भाविकांच्या सोयीसाठी दक्षीण मध्य रेल्वे विभागाने नांदेड ते बिदर अशी एक रेल्वे गाडी सुरू करण्याचे प्रसिध्द पत्रक पाठविले आहे. भाविकांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. गुरु नानक देवजी यांच्या जयंती दिनी भाविकांना बिदर येथे दर्शन घेण्यासाठी सोय व्हावी म्हणून दि.18 नोव्हेंबर रोजी गुरूवारी नांदेड येथून सकाळी 11.50 वाजता गाडी संख्या 07506 ही बिदरसाठी रवाना होईल. ही गाडी परभणी येथे दुपारी 1.20 वाजता पोहचेल. या गाडीला परळी येथे 15 मिनिटाचा थांबा आहे. त्यानंतर ही गाडी लातूर रोड येथे दुपारी 4.27 वाजता पोहचेल. ही गाडी उदगीर भालकी मार्गे बिदर येथे सायंकाळी 6.30 वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात या गाडीचा क्रमांक 07507 असेल ही गाडी बिदर येथून दि.20 नोव्हेंबर रोजी शनिवारी दुपारी 2 वाजता आपला प्रवास सुरू करेल. ही गाडी लातूर रोड येथे दुपारी 4.07 वाजता पोहचेल आणि रात्री 8.40 वाजता नांदेड येथे आपला प्रवास पुर्ण करेल. या गाडीमध्ये 15 डब्बे असतील संपूर्ण गाडी आरक्षीत असेल. या गाडीत प्रवास करण्यासाठी आपले तिकिट आरक्षीत करून भाविकांनी बिदर येथे दर्शनासाठी जाण्याचे नियोजन करावे असे आवाहन दक्षीण मध्य रेल्वे विभागाने केले आहे.