नांदेड(प्रतिनिधी)- राज्यात 376 एस.टी.चालक आणि वाहकांना निलंबित केल्याप्रकरणी आज एस.टी.विभागात निदर्शने झाली.
काल शासनाने राज्यातील 376 एस.टी. चालक आणि वाहकांना निलंबित केले होते. एस.टी.विभागातील कर्मचाऱ्यांनी मागील 12 दिवसांपासून काम बंद आंदोलन केल्यामुळे हा प्रकार घडला. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये नांदेड विभागाचे 58 कर्मचारी आहेत. त्याबाबत आज मध्यवर्ती बसस्थानकात एस.टी.कर्मचारी संघटनांनी निषेध व्यक्त करत निदर्शने करून आपला रोष व्यक्त केला आहे.
