नांदेड(प्रतिनिधी)-शहर पोलीस विभागाचे पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे हे तक्रार करण्याच्या सवईचे आहेत. अशी मुलाखत वर्तमानपत्रांना देवून खळबळ उडवली आहे. उत्तम वरपडे यांनी श्री. चंद्रसेनजी देशमुख यांचा ईतिहास सांगायला सुरूवात केली तर काय होईल? तसेच दि.9 सप्टेंबर 2019 च्या वाहतुक शाखेच्या नियुक्तीच्या आदेशात वाहतुक शाखेचे कामकाज पोलीस उपअधिक्षक मुख्यालय यांनी नियंत्रीत करावे असे असतांना मागील आठवड्यातच याच पोलीस उपअधिक्षकांनी वाहतुक शाखेला दररोजची स्टेशन डायरी पाठविण्याचे आदेश कसे दिले हा प्रश्न समोर आला आहे. एका पोलीस निरिक्षकाविरुध्द ऍन्टी करप्शनचा ट्रॅप आणण्याची तयारी करणारे हे महाशय पोलीस विभागातील लोकांबद्दल किती प्रेम आणि आदर बाळगतात हे दिसते.
आपली वसुली मी करणार नाही असे सांगणारे वजिराबाद येथील पोलीस उपनिरिक्षक उत्तम शंकरराव वरपडे पाटील बाचोटीकर यांच्या बद्दल चंद्रसेन देशमुख यांनी छोट्या-छोट्या कारणावरुन त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एका तपासासाठी उत्तम वरपडे यांना राजस्थानला जायचे होते. राजस्थानला जाण्यासाठी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी लेखी स्वरुपात वरपडे यांना परवागनी दिली होती. ही परवानगी दिल्यावर वजिराबादचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम यांनी वरपडे यांना घेवून पोलीस उपअधिक्षक कार्यालयात गेले आणि तेथे झालेल्या चर्चेनंतर वरपडेने आपले मरण वाचविण्यासाठी राजीनामा असा अर्ज लिहिला आणि तो पोलीस महासंचालकांकडे पाठवला.
या अर्जात वरपडेने व्यक्त केलेली भिती 24 तासातच समोर आली. श्री. चंद्रसेनजी देशमुख यांनी प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीनुसार सध्यास्थितीत शहरात एक धार्मिक मिरवणूक सुरू होती. म्हणून मी त्यांना जयपूरला जाणे पुढे ढकलावे असे सांगितले. ती मिरवणूक रात्री 10 वाजता संपली वरपडे यांची जयपूरला जाण्याची गाडी रात्री 1 वाजून 20 मिनिटांला होती. सोबतच चंद्रसेन देशमुख यांनी मुलाखतीत सांगितले आहे की, कामाचे नियम असतात. ते पाळून काम करायचे असते. मग पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशापेक्षा चंद्रसेन देशमुख यांचे आदेश मोठे आहेत काय हा एक नवीन प्रश्न समोर आला. वरपडे यांच्या मनाने काम करण्याचा विषयच नाही. तर पोलीस अधिक्षकांचा आदेश पाळायचा होता. वरपडेने कांही अधिकाऱ्यांविरुध्द केलेल्या तक्रारी चंद्रसेन देशमुख यांनी त्यांची नावे घेवून सांगितले आहे. त्यावेळी काय घडले होते. याची कांही पार्श्र्वभूमी मात्र चंद्रसेन देशमुख यांनी सांगितली नाही. वरपडेच्या सेवानिवृत्तीला 5 ते 6 महिने बाकी आहेत. या काळात त्यांनी चांगले काम करावे अशी अपेक्षा देशमुख यांना आहे. मग पोलीस अधिक्षक यांचा आदेश मोठा की, देशमुख यांचा आदेश मोठा हा नवीन प्रश्न समोर आला आहे.पण वरपडे यांनी देशमुखांचा ईतिहास प्रसिध्द केला तर?
कांही महिन्यांपुर्वी नांदेडच्या एका पोलीस निरिक्षकाने एक दुचाकी गाडी पकडली होती. त्याबाबत दुचाकी मालकाने देशमुख यांच्याकडे सांगितले असतांना त्यांनी त्या माणसाला पोलीस निरिक्षकावर ऍन्टी करॅप्शनचा ट्रॅप लावण्याची सुचना केली होती. मग पोलीस विभागाबाबत देशमुख यांच्या मनात किती छान भावना आहेत हे दिसते. उलट दुचाकी मालकाने असे कांही केले नाही आणि पोलीस निरिक्षकाला याची माहिती सुध्दा दिली. या भितीमुळे पोलीस निरिक्षकाने नांदेड जिल्हा बदलून घेतला. मग वरपडे तर पोलीस उपनिरिक्षक आहेत. ते यापेक्षा जास्त काय करू शकतील या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल.
कांही दिवसांपुर्वीच देशमुख यांनी नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला दररोजची स्टेशन डायरी पाठविण्याचे आदेश दिले होते. सन 2019 मधील वाहतूक शाखेच्या विभाजनाचे आदेश पाहिले असता त्यावर वाहतुक शाखांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलीस उपअधिक्षक गृह विभाग यांना देण्यात आलेले आहे. मग देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला स्टेशन डायरी पाठविण्याचा आदेश कोणत्या नियमानुसार दिला. हा नियम गुप्त आहे.
पोलीस दलात नियमानुसार काम हवे ; पोलीस अधिक्षकाचे आदेश मोठे की, पोलीस उपअधिक्षकांचे आदेश मोठे ?