नांदेड(प्रतिनिधी)-माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी आज 11 नोव्हेंबर रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आज सुरू होणाऱ्या शाळानां 22 नोव्हेंबर पर्यंत सुट्यांची वाढ देण्यात आली आहे.
दिवाळीच्या सत्रात 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर अशी दिवाळी सुट्टी शाळांसाठी जाहीर करण्यात आली होती. आज निर्गमित केलेल्या आदेशानुसार शाळांच्या सुट्टया 20 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. 21 नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने सुट्टीच आहे. त्यामुळे 22 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू होतील. ज्या शाळांमध्ये एनएएस परिक्षा आहेत. त्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी 11 व 12 नोव्हेंबर रोजी पुर्ण वेळ उपस्थित राहतील आणि परिक्षेचे काम करीत. प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर यांना सोडून इतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिर्ग सुट्टया मिळणार नाहीत. खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापनाची परवानगी मिळाल्याशिवाय मुख्यालय सोडू नये. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकाच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये असे या आदेशात नमुद आहे.