नांदेड(प्रतिनिधी)-सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, मेरी ख्वाईश है के ये सुरत बदले अशा शब्दांना आपल्या पत्रात उल्लेखीत करून ज्येष्ठ पत्रकार अनिलकेत कुलकर्णी यांनी मागील अनेक वर्षापासून प्रलंबित पडलेल्या नांदेड येथील पत्रकार भवनाचा विषय मी पुन्हा उचलणार आहे ज्या पत्रकारांना पत्रकार भवनाबद्दल आस्था आहे त्या सर्वांनी माझ्या लढात सहकार्य करावे असे पत्र व्हॉटसऍप संकेतस्थळांवर व्हायरल केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून अनेक मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या पत्रकार भवनासाठी दिलेला निधी अद्याप कामी आला नाही. तो वेगवेगळ्या पत्रकार संघटनांना दिलेला निधी एकत्रीत करून पत्रप्रबोधीनी नावाच्या नवीन संघटनेकडे वर्ग व्हावा अशी तयार झाली. पण प्रत्येक्षात असे कांही घडले नाही. अनिकेत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पत्रकार संघटनांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि पत्र प्रबोधीनीने आपली घोर फसवणूक केली आहे असे आपल्या पत्रात लिहिले आहे. आपण याचा जाब विचारायला हवा असे अनिकेत कुलकर्णी सांगतात. मी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना एक निवेदन ईमेलवर पाठविले आहे. आजपर्यंत त्याची साधी पोहच आली नाही. तरीही मी हिंम्मत हारलेलो नाही.
पत्रकार राजकुमार कोटलवार हे ऍडमिन असलेल्या एका गु्रपवर सिडको कार्यालयाने पत्रकार भवनासाठी दिलेल्या जागेवर मंदिर तयार होत आहे अशी एक पोस्ट आली होती. त्या पोस्टनंतर अनिकेत कुलकर्णी यांनी हे पत्र व्हायरल केले आहे. कांही जण सांगतात. विविध संघटनांना मिळून वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त निधी दिलेला आहे. त्याची वर्ष मोजली तर ती रक्कम आता जवळपास 1 कोटी झाली असेल. पण त्यात इमानदारी राखली गेली असेल तर. असो अनिकेत कुलकर्णी यांनी पत्रकार भवनाविषयी मांडलेल्या मुद्यांना सर्वच पत्रकारांनी साथ द्यायला हवी तरच कोणत्या संघटनेने किती पैसे गायब केले, त्या लाखो रुपयांचे काय झाले ही सर्व गुप्त झालेली माहिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर येईल आणि अनेक दुप्पटी चेहरे समोर येतील.
पत्रकार भवन चोरीला गेले ?; अनिकेत कुलकर्णी देणार लढा