नांदेड(प्रतिनिधी)-10 नोव्हेंबरच्या रात्री 1.30 वाजता लोहा शहरात एका 30 वर्षीय युवकाच्या पोटात चाकु खुपसून चोरट्यांनी 15 हजारांचा ऐवज लुटून नेला आहे. वासरी ता.मुदखेड येथे जिल्हा परिषदेची शाळा फोडून 38 हजारांची चोरी झाली आहे.
गोपिचंद जयवंतराव कहाळेकर हे 10 नोव्हेंबर रोजी रात्री 1.30 वाजेच्यासुमारास कळसकर हॉटेलसमोरून जात असतांना तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पोटात चाकु खुपसून त्यांच्याकडील मोबाईल 5 हजार रुपये किंमतीचा आणि 10 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला आहे. लोहा पोलीसांनी याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.
वासरी ता.मुदखेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा फोडून त्यातील 38 हजार रुपयांचे साहित्य चोरल्याची तक्रार मुख्याध्यापक प्रताप पावडे यांनी दिली आहे. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार आलेवार हे करीत आहेत.
लोहा येथे चाकू खुपसून लुट; वासरी येथे जि.प.शाळा फोडली