नांदेड,(प्रतिनिधी)- १६७ वर्षा पूर्वी, दिनांक १६ एप्रिल १८५३ ला भारतात पहिल्यांदाच बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे दरम्यान रेल्वे धावली होती. त्या क्षणाच्या स्मरणात भारतीय रेल्वे दर वर्षी दिनांक १० ते १६ एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा करत असते. यात रेल्वे सेवेत वर्षभर उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कार देवून गौरवण्यात येते. कोविड-१९ च्या प्रभावामुळे या वर्षीचा रेल्वे सप्ताह उशिरा साजरा केला गेला. नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात ६६ वा रेल्वे साप्ताह पुरस्कार सोहळा (डी.आर.एम. अवार्ड) आज दिनांक १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी साजरा करण्यात आला. कोविड-१९ च्या प्रभावामुळे या वर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा उशिरा साजरा करण्यात आला. उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या हस्ते 324 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यात नांदेड रेल्वे विभागातील 220 व्यक्तिगत तर 20 सांघिक पुरस्कार पुरस्कार देवून कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी श्री नागभूषण राव, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांच्यासह इतर विभागीय रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी आपल्या उद्घाटन पूर्ण भाषणात वर्ष २०२०-२१ दरम्यान कोविड महामारीच्या समयी सुद्धा नांदेड रेल्वे विभागाने केलेल्या उत्कृष्ठ कार्याची माहिती दिली आणि सर्व रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. सिंघ यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आवाहन केले कि त्यांनी उपलब्ध साधनांचा आणि निधीचा योग्य आणि सुनियोजित वापर करावा तसेच उत्पन्न वाढीबरोबरच अनावश्यक खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करावा.भारत सरकारने या वर्षी मालवाहतुकी मध्ये विशेष वाढ करण्याकरिता विशेष पर्यंत केले आहेत. या करिता विविध योजना आखल्या आहेत. ज्यात किसान रेल्वे, कार्गो एक्स्प्रेस सारख्या पूर्ण मालवाहतूक करणाऱ्या गाड्या चालविण्याची नवीन सुरुवात केली आहे. या करिता बिजिनेस डेव्हलपमेंट युनिट ची स्थापना करण्यात आली.
नांदेड रेल्वे विभागातील बिजिनेस डेव्हलपमेंट युनिट ने केलेल्या प्रयत्ना मुळेच नांदेड रेल्वे विभागातून ३०० हून अधिक किसान रेल्वे चालविण्यात आल्या. ०.२६१ मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली. जी कि गेल्या वर्षी पेक्षा २०७ % अधिक आहे. तसेच नांदेड रेल्वे विभागाने एक्स्प्रेस रेल्वे च्या समय पालनात ९५ % सफलता मिळाली आहे.
कोविड च्या संकटात नांदेड वैद्यकीय विभागाने दिलेले योगदान नेहेमीच स्मरणात राहील असे सिंघ म्हणाले. नांदेड रेल्वे विभागात रेल्वे विद्युतीकरण, रेलपथ नवीनीकरण चे कार्य सुरु आहे. सिंघ म्हणाले कि सुरक्षा हि रेल्वे ची नेहेमीच प्राथमिकता राहिली आहे. तसेच प्रवासी सुविधे मध्ये वाढ करण्याकरिता नांदेड रेल्वे नेहमीच प्रयत्नशील आहे. कोविड च्या कठीण समयी रेल्वे कर्मचाऱ्यांनी जे कार्य केले आहे यात रेल्वे कर्मचारी संघटनांचे योगदान खूप महत्वपूर्ण आहे. याबद्दल सिंघ यांनी सर्व रेल्वे कर्मचारी संघटनांचे आभार मानले.
