नांदेड (प्रतिनिधी)- संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या 751 व्या जयंती महोत्सव निमित्त उद्या दि 14 नोव्हेम्बर रोजी नांदेड येथे रक्तदान शिबीरासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत टेकडी जुना मोंढा येथील सुशोभित असलेल्या श्री संत नामदेव महाराज मंदिर परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. उद्या दि.14 नोव्हेम्बर रोजी सकाळी 7 वाजता अभिषेक पूजा अर्चना, सकाळी 10 वाजता रक्तदान शिबीर, सांयकाळी 5 वा हुजूरी खालसा मराठा भजनी मंडळाचे किर्तन भजन व सांयकाळी 6 वाजता महाआरती असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावर्षी साजऱ्या होणाऱ्या जन्म महोत्सवास 751 व्या जन्म शताब्दी वर्षाचा संदर्भ असल्यामुळे जयंतीला अनन्यसाधारण महत्व आहे. श्री संत नामदेव मंदिर मेरू शिंपी समाज नांदेड च्या वतीने हा जन्मोत्सव कार्यक्रम होत आहे. श्री नामदेव महाराज यांच्या घुमान येथील वास्तवस्थळी गत सात आठ वर्षापासून हजारो भक्तजनांना दर्शन घडवत महाराष्ट्र आणिभभागवत धर्माची महती पंजाबपर्यन्त पोहचविण्याचे महान कार्य करत असलेल्या नानक साई फाऊंडेशन चा विशेष सन्मान मेरू शिंपी समाजाच्या वतीने ठेवण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मेरू शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष शंकर सिंगेवार,उपाध्यक्ष चंद्रप्रकाश कुंटुरवार, सचिव विनोद सिंगेवार,सहसचिव अभय भुरेवार,कोषाध्यक्ष डॉ. गणेश विठोबा नोमुलवार, विश्वस्त लक्ष्मणराव संगेवार, अशोक ओझलवार,भारत यन्नावर,गजानन पोटपल्लेवार, सतिश सिंगेवार,राजेश कुंटुरवार, गजानन भुरेवार, अमोल साखरेकर, मधुकर गंदलवार, गंगाधर टेम्भुरनेवार यांनी केले आहे.