नांदेड(प्रतिनिधी)-कंधार शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 68 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. चितगिरी ता.भोकर शिवारातून दोन गोरे चोरीला गेले आहेत. देगलूर आणि नांदेड शहरातील शिवाजीनगर भागातून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. वजिराबाद भागातून तीन चोरट्यांनी दुचाकीवर एक बॅग चोरुन नेली आहे. उमरी शिवारातून तीन क्विंटल सोयाबिन चोरीला गेले आहे.
शकील गणी कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान त्यांचे घर बंद होते आणि या वेळेत चोरट्यांनी त्यांचे घर फोडून घरातील रोख रक्कम, साड्या, पितळी भांडे, सॅमसंग टि.व्ही. असा 68 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाख केला आहे. शिवाजी भाऊराव कदम यांच्या चित्तगिरी शिवार ता.भोकर येथून 50 हजार रुपये किंमतीचे दोन गोरे चोरीला गेले आहेत. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
मौजे कारेगाव ता.देगलूर येथून 29 ते 30 ऑक्टोबर दरम्यान 50 हजार रुपये किंमतीची माधव गंगाराम शिळवणे यांची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे.देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. योगेश गंगाधर पांचाळ यांची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 13 नोव्हेंबर रोजी महादेव दालमिल, नवा मोंढा भागातून चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
12 नोव्हेंबर रोजी प्रशांत अरविंद बावणे हे व्यक्ती मध्यरात्री 1 वाजता रेल्वे बसस्थानक ते रेल्वे स्थानक असे पायी जात असतांना त्यांनी रस्त्यात आपल्या हातील बॅग खाली ठेवून लघु शंका केली. दरम्यान एका दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांची बॅग उचलून पळ काढला. त्यामध्ये एक लॅपटॉप, मोबाईल, चांदीचा शिक्का, डेबीट व क्रेडीट कार्ड असा 39 हजार रुपयांचा ऐवज होता. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
उमरी शिवारातून लक्ष्मण नागनाथ गुंडवार यांच्या शेतातून मळणी करून ठेवलेले 3 क्विंटल सोयाबीन 15 हजार रुपये किंमतीचे 11 नोव्हेंबरच्या रात्री 2 ते 4 या वेळेत चोरीला गेले आहेत. उमरी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
कंधारमध्ये घरफोडले, चितगिरी शिवारातून दोन गोरे चोरले, सोयाबीन चोरले