नांदेड(प्रतिनिधी)-विवाहित महिलेला संसार सुरळीत करण्याची हुल देवून तिच्यासोबत अत्याचार करणाऱ्या अंतरराष्ट्रीय पत्रकाराला सध्या पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे. पण या प्रकरणातील मुळ भोंदु बाबा ज्याने औषधीच्या नावावर त्या महिलेला गुंगीचे औषध दिले. तो शेख अजीज बाबा अद्याप पोलीसांना सापडलेला नाही.
13 नोव्हेंबर रोजी एका विवाहित महिलेने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलीसांनी शेख अजीज बाबा आणि अंतरराष्ट्रीय पत्रकार शेख याहिया शेख इसाक या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 812/2021 दाखल केला.गुन्हा दाखल होताच कांही तासातच रात्री 2 वाजता शेख याहिया शेख इसाकला अटक झाली. 14 नोव्हेंबर रोजी दुपारी न्यायालयाने शेख याहियाला सहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. ही पोलीस कोठडी 20 नोव्हेंबर रोजी संपणार आहे.
या प्रकरणातील महिलेच्या संपर्कात आलेला भोंदू बाबा ज्याने महिलेला गुंगीचे औषध देवून अत्याचार केला आणि त्या अत्याचाराचे व्हिडीओ आणि फोटो बनविले. तो शेख अजीज बाबा अद्याप वृत्तलिहिपर्यंत पोलीसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्यावर अत्यंत कार्यवाही होण आवश्यक आहे. तरच समाजात हा संदेश जाईल की, चुकीचे काम करणाऱ्यांना पोलीस कधीच सोडत नसतात.
विवाहितेवर गुंगीच्या औषधाचा प्रयोग करणारा शेख अजीज बाबा पोलीसांना कधी सापडणार?