नांदेड(प्रतिनिधी)-तीन वेगवेगळ्या चोऱ्यांमध्ये एकूण 3 लाख 78 हजार 575 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
जसविंदरसिंघ इंदरमोहनसिंघ भाटीया यांच्या चिमा कॉम्प्लेक्स बाफना रोड येथील गोडाऊनची पट्टी काढून त्यांची कार आणि मोटारसायकलचे चार टायर असा 3 लाख 30 हजारांचा ऐवज चोरट्यांनी 14 नोव्हेंबर रोजी रात्री 1 ते 4 वाजेदरम्यान चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके हे करीत आहेत.
देगलूर येथील सायलू हनमंतराव बोगुलवार यांच्या घराच्या दरवाज्यातून 12 हजार 500 रुपये किंमतीचे सोयाबिनचे पोते 13-14 नोव्हेंबरच्या रात्री कोणी तरी चोरून नेले आहेत. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक मोरे हे अधिक तपास करीत आहेत.
संदीप रमेशराव गोपने हे गोकुळनगरमधील आपले घर बंद करून 11 नोव्हेंबर रोजी कांही कामासाठी बाहेर गावी गेले होते. 14 नोव्हेंबर रोजी परत आले तेंव्हा घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि कांही नाने असा 36 हजार 75 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार घुगे अधिक तपास करीत आहेत.
शहरात दोन आणि देगलूरमध्ये एक अशा तीन चोऱ्या