नांदेड(प्रतिनिधी)-अटकेत आणि पोलीस कोठडीत असलेल्या पवन बोराकडून फटाका व्यापाऱ्याला जिवे मारण्याची तयारी दाखवतांना त्याच्याकडे असलेली पिस्तुल जप्त केली आहे.आज मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार रहांगडाले यांनी पवन बोराची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यामुळे आता पवन बोराचे पुढील वास्तव्य तुरूंगात राहिल.
13 नोव्हेंबर रोजी सुट्टीच्या न्यायाधीशांनी पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा यास दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले होते. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार अटकोरे, आणि बामणे हे करीत आहेत.
आज पोलीस कोठडी संपल्यानंतर रवि वाहुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पवन बोराला न्यायालयात हजर करून वाढीव पोलीस कोठडी मागितली. त्यावेळी न्यायालयाने पवन बोराबद्दलच्या जुन्या गुन्ह्यांची माहिती रवि वाहुळे यांना विचारली होती. या प्रकरणात पवन बोराने याची गाडी जप्त करणे आहे आणि सापडलेल्या बंदुकीच्या 12 गोळ्या बाबत तपास करायचा आहे. तसेच पवन बोराकडे बनापरवानाचे एक पिस्तुल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या पिस्तुलचा सुध्दा शोध घ्यायचा आहे. यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असे सांगितले होते. न्यायाधीश योगेशकुमार रहांगडाले यांनी पवन बोराची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
लपलेले गुन्हेगार शोधण्याची गरज
या गुन्हा क्रमांक 397 मध्ये पोलीस प्राथमिकीच्या अभिलेखात पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा, दत्तात्रय पांडूरंग अनंतवार आणि गौतम जैन अशी तीन नावे असली तरी या प्रकरणातील या तीन कठपुतळ्या चालवणारी बोटे कोणाची आहेत. हे शोधणे सुध्दा आवश्यक आहे. नाही तरी आपल्यावर संकट आल्यानंतर माकड आपल्या लेकरांच्या सहाय्याने आपले संकट टाळते ही कहाणी हजारो वर्षापासून प्रचलित आहे. मग तो माकड कोण हे पण शोधणे अत्यंत गरजेचे आहे. जेणे करून समाजाला त्रास देणाऱ्या या व्यक्तींवर योग्य कार्यवाही होईल.
पवन बोराकडून पिस्तुल आणि 12 काडतुस जप्त केल्यानंतर आता पुढचे वास्तव्य तुरूंगात