नांदेड.(प्रतिनिधी) – बालदिनानिमित्त 16 नोव्हेंबर 2021 ते 21 नोव्हेंबर 2021 या कालावधीत नांदेड चाइल्ड 1098 सोबत मैत्रीचे बंध बांधून मुलांशी संबंधित विविध कार्यालयांना भेट देऊन त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
24 तास मोफत आपत्कालीन राष्ट्रीय मोफत दूरध्वनी सेवा 1098 नांदेड शहरात 2012 पासून 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी कार्यरत आहे ज्यांना मदत आणि काळजीची गरज आहे. पी.डी.जोशी पाटोदेकर यांच्या मार्फत चाइल्ड लाईन 1098 द्वारे विविध मार्गांनी मदतीची गरज असलेल्या मुलांना सेवा पुरविल्या जातात. यामध्ये हरवलेली मुले, अनाथ, शोषित मुले, बालविवाह, बालकामगार, बाल भिकारी, वैद्यकीय, समुपदेशन, वैद्यकीय सुविधा यांचा समावेश होतो. निवारा देणे, किशोरवयीन मुलांच्या विविध समस्या सोडवणे या माध्यमातून सेवा दिल्या जातात.
महिला आणि बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली मार्फत हा प्रकल्प देशभरात राबविण्यात येत असून मुलांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्ताहादरम्यान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात महावीर चौकात स्वाक्षरी मोहिमेने करण्यात आली. महापौर सौ.जयश्री पावडे यांच्याद्वारे कार्यक्रमाचे उद्घाटनकरण्यात आले.यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉ.शेख अब्दुल रशीद, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, बाल न्याय मंडळाचे सदस्य डॉ.हरदीप सिंग खेम सिंग, बालकल्याण समिती नांदेडचे सदस्य अॅड. सावित्री जोशी, परिवार सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष डॉ.पी.डी.जोशी पाटोदेकर, भारत स्काऊट गाईड समन्वयक केंद्रे सर, नगरसेविका चिखलवाडी नांदेड सौ. खालसा कौर, श्री.अमित तेहारा, श्री.प्रकाश मुथा, श्री.भानुसिंग रावत, श्री. दिलीपसिंग रावत, सौ. सोडी, तसेच नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. स्वाक्षरी मोहिमेला समाजातील व्यक्ती व सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापौर सौ.जयश्री पावडे यांनी बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या व नांदेड शहरातील सर्व बालकांची काळजी घेणार असे बोलल्या,व बालदिन सप्ताहाच्या सर्व कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळावा अशा शुभेच्छा दिल्या. तसेच नांदेड चाइल्ड लाईन 1098 च्या टीम सदस्या संगीता कांबळे यांनी कार्यक्रमाचा परिचय करून दिला, गेल्या एक वर्षात हाताळलेल्या केसेसची माहिती दिली व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. यावेळी नांदेड चाइल्ड लाईन 1098 केंद्राचे समन्वयक बालाजी आलेवार समुपदेशन आशा सुर्यवंशी, टीम सदस्य संगीता कांबळे, नीता राजभोज, आकाश मोरे, अश्विनी गायकवाड, जयश्री दुधाटे, नामदेव लांडगे, स्वयंसेवक एकनाथ पाच्छे व सर्व नागरिक सहभागी झाले होते.