नांदेड(प्रतिनिधी)-फटाका व्यापाऱ्याला धमकी दिलेल्या घटनाक्रमात गौतम नरसिंगदास हिरावत उर्फ गौतम जैन याला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.के. गौतम यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत अटकपुर्व अंतरिम जामीन मंजुर केला आहे.
दि.3 नोव्हेंबर रोजी धनराज बद्रीनारायण मंत्री यांनी दिलेल्या अर्जावरून पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा, दत्तात्रय पांडूरंग अनंतवार आणि गौतम नरसींगदास हिरावत उर्फ गौतम जैन यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 397 दाखल झाला. या प्रकरणात पवन जगदीश बोराला अटक झाली त्याच्याकडून पोलीसांनी एक पिस्तुल आणि 12 जीवंत काडतुसे जप्त केली.
या प्रकरणी दत्तात्रय पांडूरंग अनंतवार आणि गौतम जैन यांनी जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज क्रमांक 893 आणि 899 दाखल केले. या प्रकरणातील सुनावणी काल सुनावणी 16 नोव्हेंबर रोजी होती. 16 नोव्हेंबर रोजी असलेल्या बंदोबस्तामुळे पोलीसांनी आपला से दाखल केला नाही. म्हणून या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली. पण गौतम जैनने या प्रकरणात अटकपुर्व जामीन अर्ज सादर केलेलाच होता. त्यात अंतिम सुनावणी होईपर्यंत अंतरिम अटकपुर्व जामीन देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. ती विनंती न्यायालयाने 30 नोव्हेंबरपर्यंत मंजुर केली आहे.