नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या बोंढार भागातून स्थानिक गुन्हे शाखा बीडने बायोडिझेलचे तीन भरलेले टॅंकर ज्यात 72 हजार लिटर बायोडिझेल होते अशी बातमी वास्तव न्युज लाईव्हने प्रसिध्द केली होती. ती बातमी प्राप्त झालेल्या माहिती अनुरूप होती. आज सायंकाळी या बाबत एक नवीन सत्य समोर आले असून सहाय्यक पोलीस अधिक्षक उपविभाग केज जि.बीड यांनी ते टॅंकर नेले असल्याची माहिती आहे. स्थानिक गुन्हा शाखा नाही तर बीड जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस अधिक्षक कार्यालयाने केलेली ही कार्यवाही आहे. त्यातील दोन टॅंकर बायोडिझेलने भरलेले आहेत आणि एक टॅंकर रिकामे आहे हे आणि हे तिनही टॅंकर सध्या केज उपविभाग जि.बीड यांच्या कार्यालयात आहेत.
19 तारखेच्या रात्री 2 वाजेच्यासुमारास बोंढार शिवारातून तीन बायोडिझेलचे टॅंकर नेल्याची माहिती वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झाल्यानंतर त्या बाबत नांदेड जिल्ह्यात माहिती घेतली असता असे कांही घडले नाही असाच आव आणला गेला. पण माहिती देणाऱ्याने बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी हे टॅंकर नेल्याची माहिती दिली त्यानुसार वास्तव न्युजने ती बातमी प्रसिध्द केली होती. दुपारनंतर या बाबत प्राप्त झालेली नवीन माहिती अशी आहे की, सहाय्यक पोलीस अधिक्षक कार्यालय उपविभाग केज जि.बीड येथील वाचक पोलीस उपनिरिक्षक एम.के.माने यांनी नांदेडच्या लोहा पोलीस ठाण्यात फोनवरून सांगितले की, सुनिल मोहनराव डांगे (35) यास आम्ही बायोडिझेल बाबत चौकशी कामी केज येथे घेवून जात आहोत. या बाबतची नोंद लोहा पोलीस ठाण्यात ठाणे दैनंदिनी क्रमांक 10 वर 19 नोव्हेंबर 2021 रोजी 09.37 वाजता घेतलेली आहे.
प्रसार माध्यमे त्यांना प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारावर बातम्या लिहित असतात. याबाबत दुसरी माहिती प्राप्त झाली. ती पण लिहिली. सध्या हे बायोडिझेल टॅंकर केज उपविभाग जिल्हा बीड कार्यालयात उभे आहेत. त्यात दोन टॅंकर बायोडिझेलने भरलेले आहे आणि एक टॅंकर रिकामे आहे. स्थानिक गुन्हा शाखा बीड आणि केज उपविभाग कार्यालय बीड या दोन विभागांना वेगळे कसे करता येईल. केज उपविभागाततर भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी नियुक्त आहेत. बीड जिल्हा पोलीसांनीच ही कार्यवाही केलेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र याबाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. पण बायोडिझेलचे कांही प्रकरण बोंढार शिवारातून सुरू झाले आणि ते केज उपविभाग कार्यालयात सध्या सुरू असल्याचे दिसते.
बोंढार शिवारातील बायोडिझेल प्रकरण स्थानिक गुन्हा शाखा बीडचे नसून सहाय्यक पोलीस अधिक्षक कार्यालय केज जि.बीडचे