नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहित महिलेला तुझा संसार सुस्थितीत करून देतो असे सांगून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पत्रकार शेख याहिया यास न्यायालयाने सध्या तुरूंगात पाठविले आहे.
14 नोव्हेंबर बालदिनी शेख याहिया शेख इसाक यास एका महिलेच्या तक्रारीनंतर अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास सहा दिवस अर्थात आज 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. आज पोलीस कोठडी संपल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी शेख याहियाला न्यायालयीन कोठडीत घेण्याची विनंती करून आणल्यानंतर पाचव्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी पत्रकार शेख याहिया शेख इसाकला न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात पाठवून दिले आहे.
समाजात पत्रकारीता करतांना सर्वसामान्य माणसाचे लपलेले आवाज मांडण्याची मुभा असते. शेख याहियाने आपल्या जीवनात अशा अनेक जणांचे आवाज समाजासमोर मांडले. आता त्यांना तुरूंगात असलेल्या लोकांवर झालेले अन्याय मांडण्याची नवीन संधी प्राप्त झाली आहे.
पत्रकार शेख याहिया यांना तुरूंगातून पत्रकारिता करण्याची संधी