
नांदेड,(प्रतिनिधी)- काल सोनखेड आणि कंधार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या दरोडा प्रकरणी पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळीसह असंख्य पोलीस रस्त्यावर उतरले आणि लोहाचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे,अनेक पोलीस अमलदारांनी आणि जनतेतील लोकांनी केलेल्या मेहनतीला फळ आले आणि एक दरोडेखोर पकडला आहे.त्याच्या जवळ दोन अग्निशस्त्र असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
काल शेवडी बाजीराव येथील काही विद्यार्थ्यांना दुचाकी गाडीवर आलेल्या तीन दरोडेखोरांनी लुटले.त्यांच्या एक मोबाईल आणि ४ हजार रुपये हे दरोडेखोर लुटून पसार झाले.काही वेळातच दुसरा प्रकार कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर,लोहाचे संतोष तांबे,कंधारचे पोलीस निरीक्षक पडवळ,सोनखेडचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर सोबतच जनतेतील काही लोक पोलिसांच्या सोबत काम करू लागले. त्यासह पालम,अहमदपूर आणि गंगाखेडचे पोलीस सुद्धा रस्त्यावर उतरले,
अखेर एक दरोडेखोर अनिल सुरेश पवार उर्फ पंजाबी लोहाचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाती लागलाच.प्राप्त माहितीनुसार अत्यंत रिस्क घेऊन पोलिसांनी अनिल पंजाबीला पकडले. त्याच्याकडे दोन अग्निशस्त्र असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.अनिल पंजाबी अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा आहे. हा दरोडेखोर आणि त्याचे साथीदार तुरुंगात गेले तर नक्कीच सर्वसामान्य जनता वाचणार आहे.अनिल पंजाबीला पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी कौतुक केले आहे.