नांदेड(प्रतिनिधी)-अखेर ग्रामीण पोलीस ठाण्यात सराफ व्यापाऱ्याला लुटल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घर फोडले आणि उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लोखंडी खांब चोरीला गेले.
माणिक गोविंदराव मोरे यांचे साईबाबा कमान कौठा येथे घर आहे. आपले दुकान बंद करून 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता माणिक मोरे आपल्या घरी आले आणि आपल्या दुचाकी गाडीतील आपली सोने -चांदी ठेवलेली बॅग काढत असतांना तीन चोरटे आले आणि त्यांनी माणिक मोरे यांना मारहाण करून त्यांच्याकडून ती बॅग बळजबरीने चोरुन नेली. त्यामध्ये 2 लाख 17 हजारांचा ऐवज होता. 20 नोव्हेंबर रोजी सराफा व्यापाऱ्यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गर्दी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडी आणि चोरी
सरस्वती अंबादास खरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19-20 नोव्हेंबरच्या रात्री त्यांच्या घरी लॉक लावून त्या आईकडे गेले असतांना कोणी तरी त्यांचे घरफोडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे व कार्ड असा एकूण 14 हजार 514 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार कळणे अधिक तपास करीत आहेत.
धम्मपाल नारायण कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डोणगाव ता.लोहा येथील रोलींग मिलमधील पाच लोखंडी खांब 60 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी 8 नोव्हेंबर रोजी चोरून नेले आहेत. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कानगुले अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोेलीसांनी अखेर सराफा व्यापारी लुट प्रकरणी गुन्हा दाखल केला