नांदेड (प्रतिनिधी)- आज महानगरपालिकेतील सर्व साधारण सभेत नांदेड महानगरपालिका सभागृहात बसलेल्या अनेकांनी कोवीड लसीकरण करून घेतले नाही, असा गंभीर आरोप डॉ. सुनील लहाने यांनी केला. महानगरपालिका हद्दीत आतापर्यंत फक्त 50 टक्के लसीकरण झाले आहे, अशी माहिती दिली तेव्हा कोणीही यावर आक्षेप तर घेतलाच नाही उलट मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी लसीकरणासंदर्भाने नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले.
कोवीडमुळे आज पहिल्यांदाच प्रत्यक्षात सर्वसाधारण सभा झाली. कॉंग्रेसचे बाहुल्य असलेल्या या सर्वसाधारण सभेत ध्वनीक्षेपात सर्वच ठराव मंजूर झाले. या सभेत मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी शहरातील कोवीड लसीकरणावर आपली खंत व्यक्त करताना त्या सभागृहात बसलेल्या अनेकांनी अद्याप कोवीड लसीकरण करून घेतले नाही, असे सांगितले. सोबतच शहरात अद्याप फक्त 50 टक्के कोवीड लसीकरण झाले आहे, अशी माहिती असल्याचे डॉ. सुनील लहाने म्हणाले. नगरसेवकांनी कोवीड लसीकरणात पुढाकार घ्यावा असे आवाहन सुद्धा डॉ. सुनील लहाने यांनी केले.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बसलेल्या अनेकांनी कोवीड लस घेतली नाही -मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने