नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील व्यंकटेशनगर भागात बाहेरगावी गेलेल्या कुटूंबाचे घरफोडून चोरट्यांनी 50 हजारांचा ऐवज लांबवला आहे. बिलोली रोड रामतिर्थ येथे बंद घराला फोडून चोरट्यांनी 72 हजारांचा ऐवज लंपास केला आहे आणि मुखेड येथून एक दुचाकी गाडी चोरीला गेली आहे.
बालाजी गंगाधर बोकारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6.30 ते 22 नोव्हेंबरच्या सकाळी 6.34 दरम्यान त्यांचे बंद घर तोडून कोणी तरी चोरट्यांनी त्यातील रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिणे असा 50 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार शिरसाठ अधिक तपास करीत आहेत.
चॉंद पटेल खाजा मियॉ कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रामतिर्थ येथील बिलोली रस्त्यावरील त्यांच्या घरासमोरील पत्रांवर चढून कोणी तरी त्यांच्या घराचे कुलूप तोडले ही घटना 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर 2 वाजेपासून 22 नोव्हेंबरच्या सकाळी 11 वाजेदरम्यान घडली. घरातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 72 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. रामतिर्थ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.
मुखेड शहरातील चौधरी फंक्शन हॉलसमोरून भगवान अमृतराव वडजे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.बी.6883 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी 21 नोव्हेंबरच्या दुपारी चोरीला गेली आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भारती अधिक तपास करीत आहेत.
व्यंकटेशनगर नांदेड आणि रामतिर्थ येथे दोन घरफोडले; मुखेडमधून दुचाकी चोरी